Maratha Reservation | जालना: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचं जालना जिल्ह्यामध्ये उपोषण सुरू आहे. आज त्यांच्या उपोषणाचा सतरावा दिवस आहे.
मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतलं असलं तरी त्यांचं आंदोलन कायम सुरू आहे. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी मुंबईहून जालन्याला रवाना झाले आहे.
याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आरक्षण घेतल्याशिवाय मी सोडणार नाही असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.
I will not leave without reservation – Manoj Jarange
प्रसारमाध्यमांशी बोलत असताना मनोज जरांगे म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मला भेटायला येत आहे. या भेटीनंतर आरक्षण मिळेल की नाही याबद्दल मी आता काही सांगू शकत नाही.
मात्र, मी आरक्षण घेतल्याशिवाय (Maratha Reservation) सोडणार नाही एवढेच मी सध्या सांगू शकतो. मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंद खोलीत चर्चा करणार नाही.
त्यांची आणि माझी चर्चा प्रसारमाध्यमांसमोरच होईल. सर्वांच्या समोर आमची चर्चा होणार आहे. यामुळे समाजाचा आत्मविश्वास वाढेल. म्हणून मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याची मागणी केली आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, “आमचं आंदोलन यशस्वी ठरलं आहे, हे आता म्हणता येणार नाही. जेव्हा सरकार आमच्या हातात पत्र देईल त्या दिवशी आमची ही लढाई यशस्वी ठरेल.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अत्यंत धाडसी आहे. त्याच विश्वासाने मी बोलत आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात निर्णय घेण्याची क्षमता आहे. मुख्यमंत्र्यांनी समाजाला प्रबोधन केलं तर समाजाला एक चांगला संदेश मिळू शकतो.”
महत्वाच्या बातम्या
- Uddhav Thackeray | मोदी काळात सनातन धर्माचे विकृतीकरण झालेय; ठाकरे गटाचं मोदी सरकारवर टीकास्त्र
- Deepak Kesarkar | बोलून मोकळ व्हायचं म्हणजे योग्य निर्णय घ्यायचा; व्हायरल व्हिडिओवर दीपक केसरकरांची प्रतिक्रिया
- Vijay Wadettiwar | संभाजी भिडे उपोषण स्थळी राज्य सरकारची वकिली करायला गेले – विजय वडेट्टीवार
- Maratha Reservation | समाजाची दिशाभूल करणं सरकारला महागात पडेल – मनोज जरांगे
- Aditya Thackeray | हीच ती गद्दारी वृत्ती; ‘त्या’ व्हिडिओवरून आदित्य ठाकरेंनी CM शिंदेंना धारेवर धरलं