Share

Aditya Thackeray | हीच ती गद्दारी वृत्ती; ‘त्या’ व्हिडिओवरून आदित्य ठाकरेंनी CM शिंदेंना धारेवर धरलं

🕒 1 min read Aditya Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. बोलून मोकळ व्हायचं आणि निघून जायचं, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवारांना (Eknath Shinde) म्हटलं असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. Related News for Youविधान … Read more

Published On: 

🕒 1 min read

Aditya Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

बोलून मोकळ व्हायचं आणि निघून जायचं, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवारांना (Eknath Shinde) म्हटलं असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर अजित पवारांनी यस यस अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माईक चालू आहे, असं म्हटलं आहे.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओवरून ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. हीच ती गद्दारी वृत्ती, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे.

Is this their sensitivity towards the Maratha protesters? – Aditya Thackeray 

ट्विट करत आदित्य ठाकरे म्हणाले, “बोलून मोकळं व्हायचं आणि निघून जायचं!” – घटनाबाह्य मुख्यमंत्री . ही ह्यांची मराठा आंदोलकांबद्दलची संवेदनशिलता? खरतर हीच ती गद्दार वृत्ती!

गेलं १.५ वर्ष महाराष्ट्र ह्या गद्दार गॅंगच्या भूलथापा ऐकून घेतंय. ह्या मिंधे-भाजपा सरकारवर मराठा समाज तर सोडाच पण देशातील एक तरी नागरिक विश्वास ठेवेल का?

तुरुंगात जायचं नाही आणि मुख्यमंत्री पदावर बसायचं म्हणून ज्यांनी ह्यांना घडवलं, वाढवलं, पदं दिली, सत्ता दिली त्यांचे नाही होऊ शकले, तर हे महाराष्ट्राचे काय होणार??? दुर्दैव आहे आमच्या राज्याचं की गद्दारी करून हे असलं खोके-धोके सरकार महाराष्ट्रातल्या नागरिकांवर लादलं गेलंय!”

दरम्यान, या प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीनंतर सह्याद्री अतिथिगृह येथे पत्रकार परिषदेपूर्वी आपला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचा माईकवरील संवाद ‘सोशल मीडीया’वरून चुकीच्या पध्दतीने संपादित करुन फिरविणे अत्यंत खोडसाळपणाचे आहे.

मराठा आरक्षणाबाबत सरकार सुरुवातीपासून संवेदनशील असून कायद्याच्या चौकटीत बसेल असे आरक्षण देण्याबाबत सरकार प्राधान्याने काम करीत आहे.

तसेच मराठा आरक्षणाबाबत पहिल्यांदाच अशा सर्व पक्षांच्या नेत्यांना एकत्र बोलावून या विषयी त्यांचे एकमत घेण्यात आले आहे. शासनाने इतकी चांगली भूमिका घेतली असतांना मुद्दामहून काही विरोधक खोडसाळपणे आणि व्हिडीओ क्लिप चुकीच्या पद्धतीने संपादित करून लोकांच्या मनात गैरसमज पसरविण्याचे काम करीत आहेत हे अतिशय निंदनीय आहे.

आमच्या एकमेकांमधील संवादाची मोडतोड करून संपादित करून दाखवून या घटकांनी जाणीवपूर्वक निंदनीय कृत्य केले आहे. शासन एकीकडे या संवेदनशील विषयावर ठोस भूमिका आणि निर्णय घेत आहे.

अशा पार्श्वभूमीवर समाजात सोशल मीडियातून गैरसमज निर्माण करण्याचा कृत्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे”, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही