Maratha Reservation | सोलापूर: गेल्या सोळा दिवसापासून मनोज जरांगे जालना जिल्ह्यामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करत आहे.
मंगळवारी (12 सप्टेंबर) शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे प्रमुख आणि संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी आंदोलन स्थळाला भेट दिली. त्यानंतर त्यांनी मनोज जरांगे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता.
याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनी राज्य सरकारवर खोचक टीका केली आहे. मराठा आंदोलन गुंडाळण्यासाठी सरकारने संभाजी भिडेंना सुपारी दिली असल्याचं शरद कोळी (Sharad Koli) यांनी म्हटलं आहे. शरद कोळी यांच्या या वक्तव्यानंतर ठाकरे गट आणि सत्ताधाऱ्यांमध्ये नवा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
The state government is upset with Manoj Jarange’s agitation – Sharad Koli
सोलापूरमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना शरद कोळी म्हणाले, “आंदोलन कशाप्रकारे करायचं? हे मनोज जरांगे यांनी सांगितलं आहे. त्यांच्या आंदोलनामुळे राज्य शासन अस्वस्थ झालं आहे.
त्याचबरोबर त्यांच्या या आंदोलनामुळे सरकारच्या पायाखालची वाळू घसरत चालली आहे. म्हणून मनोज जरांगे यांचं आंदोलन गुंडाळण्यासाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी संभाजी भिडे यांना सुपारी दिली आहे. त्यामुळे संभाजी भिडे यांनी आंदोलन स्थळाला भेट दिली आहे.”
पुढे बोलताना ते म्हणाले, “गेल्या पंधरा दिवसापासून जालना जिल्ह्यामध्ये मनोज जरांगे यांचं मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलन सुरू आहे.
संभाजी भिडे यांना मराठा बांधवांची आणि आंदोलनाची एवढीच काळजी होती तर ते पंधरा दिवस कुठे गायब होते? त्यांना पंधरा दिवस मराठा समाजाच्या भावना दिसल्या नाही का?
मराठा आंदोलनाची हवा काढून आंदोलन पंक्चर करण्याची जबाबदारी राज्य शासनाने भिडेंवर सोपवली आहे. भाजपने त्यांना यासाठी सुपारी दिली आहे.
म्हणूनच त्यांनी पुढाकार घेत आंदोलन स्थळाला भेट दिली. त्यांनी हे आंदोलन मागे घेण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी हे आंदोलन यशस्वीरित्या होणार आहे. मागणी पूर्ण झाल्याशिवाय जरांगे स्वस्त बसणार नाही.”
महत्वाच्या बातम्या
- Supriya Sule | शासनाने मराठा समाजावर मोठा अन्याय केलाय; सुप्रिया सुळेंची राज्य सरकारवर टीका
- Maratha Reservation | मराठ्यांना आरक्षण मिळणार? रात्री उशिरा CM शिंदे आणि जरांगेंची फोनवर चर्चा
- Sanjay Raut | तुमचे आश्वासनाचे फुलबाजे विझले का? संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना सवाल
- Maratha Reservation | मनोज जरांगेंनी उपोषण मागे घेतल्यानंतर जालन्यात नेमकं काय घडतंय? जाणून घ्या
- Uddhav Thackeray | मिंधेंच्या सरकारला शेतकऱ्यांच्या आत्महत्येची काही चाड उरली आहे का? ठाकरे गटाचा खडा सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











