Maratha Reservation | जालना: मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचं आंदोलन सुरू आहे. आज त्यांच्या आंदोलनाचा सोळावा दिवस आहे.
उपोषणाच्या पंधराव्या दिवशी त्यांची तब्येत खालवल्यामुळे त्यांनी उपोषण मागे घेतलं आहे. उपोषण मागे घेतलं असलं तरी ते त्यांच्या आंदोलनावर ठाम आहे. आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका मनोज जरांगे यांनी स्पष्ट केली आहे.
या मुद्द्यावर निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगे यांनी राज्य शासनाला एक महिन्याचा कालावधी दिला आहे. याच पार्श्वभूमीवर काल उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. यानंतर जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत फोनवर चर्चा केली आहे.
Eknath Shinde should come to the place of fast – Maratha Reservation
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या चर्चेबद्दल माहिती देत असताना मनोज जरांगे म्हणाले, “मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली आहे.
त्याचबरोबर त्यांनी माझ्या तब्येतीची देखील विचारपूस केली आहे. पहिले तीन महिने वाया गेले आहे, कारण पहिल्या समितीने काम केलं नाही. त्यामुळे आम्ही राज्य शासनाला एक महिन्याचा वेळ दिला आहे.
आम्ही आता अमरण उपोषण सोडून साखळी उपोषण करणार आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता प्रत्यक्ष उपोषण स्थळी यावं. उपोषण स्थळी येण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच निर्णय जाहीर करणार आहे.”
दरम्यान, यावेळी उदय सामंत यांनी देखील मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक आहे.
मनोज जरांगे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चर्चा झाली आहे. मुख्यमंत्र्यांचा काही निरोप असेल तर मी तो जरांगे यांना देईल. त्यांचं उपोषण थांबलं पाहिजे. त्याचबरोबर त्यांची प्रकृती चांगली राहिली पाहिजे, हीच राज्य सरकारची भूमिका आहे.
मनोज जरांगे यांच्या मागणीवर तोडगा काढण्यासाठी सरकारने तीस दिवसांचा कालावधी मागितला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी आम्ही सर्वजण काम करत आहोत.”
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Raut | तुमचे आश्वासनाचे फुलबाजे विझले का? संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना सवाल
- Maratha Reservation | मनोज जरांगेंनी उपोषण मागे घेतल्यानंतर जालन्यात नेमकं काय घडतंय? जाणून घ्या
- Uddhav Thackeray | मिंधेंच्या सरकारला शेतकऱ्यांच्या आत्महत्येची काही चाड उरली आहे का? ठाकरे गटाचा खडा सवाल
- Abdul Sattar | उठाव करणारे फुगे नाही तर योद्धा आहे; अब्दुल सत्तारांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर
- Girish Mahajan | उद्धव ठाकरेंच्या व्यंगावर बोलल्यास त्यांना तोंड लपवावे लागेल – गिरीश महाजन