Share

Uddhav Thackeray | मिंधेंच्या सरकारला शेतकऱ्यांच्या आत्महत्येची काही चाड उरली आहे का? ठाकरे गटाचा खडा सवाल

🕒 1 min read Uddhav Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: येत्या शुक्रवारी शिंदे सरकारचं मंत्रिमंडळ मराठवाड्यात जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटानं शिंदे गटावर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. हजारो कोटी रुपये खर्च करून आयोजित केलेल्या जी 20 शिखर परिषदेच्या यशाचे गोडवे गाणाऱ्या भाटांची तोंडे आपल्याच प्रांतातील शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांवर मात्र काहीच बोलत नाहीत. Related News … Read more

Published On: 

🕒 1 min read

Uddhav Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: येत्या शुक्रवारी शिंदे सरकारचं मंत्रिमंडळ मराठवाड्यात जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटानं शिंदे गटावर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे.

हजारो कोटी रुपये खर्च करून आयोजित केलेल्या जी 20 शिखर परिषदेच्या यशाचे गोडवे गाणाऱ्या भाटांची तोंडे आपल्याच प्रांतातील शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांवर मात्र काहीच बोलत नाहीत.

महाराष्ट्रातील मिध्यांच्या सरकारला तरी शेतकन्यांच्या आत्महत्यांची काही चाड उरली आहे काय?, असं आजच्या सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

Read Samana Editorial

गेल्या आठ महिन्यांमध्ये मराठवाडय़ात 685 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे हे उच्चांकी प्रमाण शरमेने मान खाली घालायला लावणारे आहे.

दररोज सरासरी तीन शेतकरी आत्महत्या करीत आहेत आणि अत्यल्प पावसामुळे मराठवाडय़ावर ओढवलेले दुष्काळाचे भीषण सावट पाहता आत्महत्यांचे प्रमाण वाढण्याचा धोका आहे.

कमालीचे नैराश्य आणि वैफल्य यामुळे मराठवाडय़ातील शेतकरी रोज मृत्यूला कवटाळत असतानाच मिंध्यांचे ‘खोके’ सरकार मंत्रिमंडळ बैठकीसाठी मराठवाडयात येत आहे. जीवन संपवायला निघालेल्या मराठवाडय़ातील गोरगरीब शेतकऱ्यांच्या मदतीसाठी या बैठकीतून काही ‘खोकी’ खर्ची पडतील काय?

राज्यातील एक फुल, दोन हाफ’ सरकार येत्या शुक्रवारी छत्रपती संभाजीनगरात मुक्कामाला येत आहे. मिधे सरकारच्या मंत्रिमंडळाची एक बैठक मराठवाडयात घ्यायची, हा सोपस्कार पूर्ण करण्यासाठीच ही बैठक आहे, असे दिसते.

अवघे मंत्रिमंडळ शहरात येणार म्हणून सर्वत्र रंगरंगोटीची कामे सुरू आहेत. त्यातच मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवाचा समारोप करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेदेखील 75 मिनिटांच्या दौयावर येणार असल्याने शहरात रंगसफेदीचे काम जोरात हाती घेण्यात आले आहे.

पण दुष्काळाच्या संकटात काळवंडलेल्या मराठवाडयाला व मराठवाडयातील शेतकन्यांना या वरवरच्या रंगरंगोटीने काय मिळणार आहे? ऐन पावसाळयात ओढवलेले दुष्काळाचे संकट, सततची नापिकी आणि डोक्यावरील कर्जाच्या असहय बोजामुळे मराठवाडय़ात रोज कुठे ना कुठे शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत.

रविवारी तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकाच दिवशी तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या हे। झाले एका दिवसाचे पण गेल्या आठ महिन्यांत मराठवाडय़ात तब्बल 685 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या यापैकी 475 शेतकयांच्या आत्महत्या सरकारी मदतीसाठी पात्र ठरवण्यात आल्या आहेत, तर 200 हून अधिक शेतकरी कुटुंबे मदतीपासून वंचित आहेत.

एकीकडे देशात जी 20 शिखर परिषदेच्या आयोजनावरून ‘बघा, देश किती पुढे गेला, असे ढोल बडवले जात आहेत. समाज माध्यमांवर कायम पडून असलेल्या टोळया वांझोटया उन्मादाचे वातावरण निर्माण करत आहेत.

जी 20 चे आयोजन करून जगभरातील राष्ट्रप्रमुखांचे आगतस्वागत केले म्हणजे देशातील सारे प्रश्न जणू काही संपुष्टातच आले आहेत, असे आभासी चित्र निर्माण करण्यात भक्तमंडळींच्या टोळधाडी मश्गुल असतानाच महाराष्ट्रातील व खासकरून मराठवाडा, विदर्भातील पिचलेले शेतकरी मात्र गळफास घेऊन वा विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करीत आहेत.

हजारो कोटी रुपये खर्च करून आयोजित केलेल्या जी 20 शिखर परिषदेच्या यशाचे गोडवे गाणाऱ्या भाटांची तोंडे आपल्याच प्रांतातील शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांवर मात्र काहीच बोलत नाहीत.

महाराष्ट्रातील मिध्यांच्या सरकारला तरी शेतकन्यांच्या आत्महत्यांची काही चाड उरली आहे काय? राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्रच सुरू झाले आहे, पण मिंधे सरकारमधील एकही मंत्री संत्री त्यावर बोलायला तयार नाही.

एकमेकांवर कुरघोड्या करण्यातच मग्न असलेल्या या तीन पायांच्या सरकारकडे शेतकन्यांसाठी वेळ आहे तरी कुठे? तब्बल 40 दिवस पावसाने ओढ दिल्यामुळे राज्यातील बहुतांश भागांत खरीप पिकांचा हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेला आहे.

कोरडवाहू जमिनींवरील कापूस, सोयाबीन, मका इत्यादी पिके शेतकन्यांच्या डोळयांसमोर वाकून गेली चार दिवसांपूर्वी थोडाफार पाऊस झाला, पण पुस दोन दिवसांपासून कडक ऊन पडू लागले आहे भरघोस पाऊस पाडणारा ऑगस्ट महिनाही उन्हाळयासारखा रखरखीत गेला, त्यामुळे मराठवाडा विदर्भ, उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्राच्या काही जिल्हयात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली हे संकट साधेसुधे नाही सप्टेंबरचा निम्मा महिना संपला आहे.

पावसाळयाचे जेमतेम शेवटचे पंधरा दिवस शिल्लक आहेत दोन दिवसांच्या शिडकाव्यानंतर पाऊस पुन्हा गायब झाला आहे. गतवर्षी याच महिन्यात राज्यातील सारी धरणे तुडुंब भरली होती. मराठवाडयातील जायकवाडीसह अनेक प्रकल्प ओसंडून वाहात होते.

यावर्षी मात्र सारी धरणे व लहान-मोठया प्रकल्पांतील जलसाठा 40 टक्क्यांच्या खालीच आहे. विहिरी, तलावांनी पावसाळयातच तळ गाठला आहे.

त्यामुळे उन्हाळयापर्यंत तग कसा धरायचा आणि शेती, पिके व फळबागा कशा वाचवायच्या, या चिंतेने शेतकन्यांची झोप उडाली आहे. खरीप हंगामासाठी गावातीलच सधन व्यक्तींकडून उधार- पाधार घेऊन शेतकन्यांनी पेरणी केली.

दुष्काळी परिस्थितीने उसनवारी करून केलेली पेरणी तर वाया गेलीच, पण हातउसने म्हणून घेतलेल्या कर्जाची फेड कशी करायची, असा प्रश्न शेतकयांना पडला आहे.

या विवंचनेतूनच रविवारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तीन शेतकन्यांनी आपले जीवन संपवले कन्नड तालुक्याच्या हतनूर येथील दिनकर बिडवे या शेतकऱ्याने घरातच गळफास घेतला.

फुलंब्री तालुक्यातील माणिकराव पाटोळे आणि वैजापूरमधील अरविंद मतसागर या शेतकन्यांनी विषारी औषध घेऊन मरण पत्करले. गेल्या आठ महिन्यांमध्ये मराठवाडयात 685 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे हे उच्चांकी प्रमाण शरमेने मान खाली घालायला लावणारे आहे. दररोज सरासरी तीन शेतकरी आत्महत्या करीत आहेत आणि अत्यल्प पावसामुळे मराठवाडयावर ओढवलेले दुष्काळाचे भीषण सावट पाहता आत्महत्यांचे प्रमाण वाढण्याचा धोका आहे.

कमालीचे नैराश्य आणि वैफल्य यामुळे मराठवाडयातील शेतकरी रोज मृत्यूला कवटाळत असतानाच मिध्यांचे ‘खोके सरकार मंत्रिमंडळ बैठकीसाठी मराठवाडय़ात येत आहे. जीवन संपवायला निघालेल्या मराठवाडयातील गोरगरीब शेतकऱ्यांच्या मदतीसाठी या बैठकीतून काही ‘खोकी’ खर्ची पडतील काय?

सौजन्य – सामना

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही