Ajit Pawar | जळगाव: आज (12 सप्टेंबर) जळगाव जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र सरकारचा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पार पडला. राज्य सरकारचे उपक्रम आणि योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेचं संबोधन केलं आहे. यावेळी बोलत असताना अजित पवारांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) अप्रत्यक्ष टीका केली आहे.
Can’t I criticize? – Ajit Pawar
गेल्या काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांची जळगाव जिल्ह्यामध्ये जाहीर सभा झाली होती. या सभेमध्ये बोलत असताना उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारवर शाब्दिक हल्लाबोल चढवला होता.
याच पार्श्वभूमीवर अजित पवार (Ajit Pawar) यांनी उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. अजित पवार म्हणाले, “मला टीका करता येत नाही का? आम्ही देखील वाभाडे बाहेर काढू शकतो.
मात्र, यातून सर्वसामान्यांचे प्रश्न सुटत नाही. त्याचबरोबर असं बोलून रोजगार देखील मिळत नाही. म्हणून आम्ही कुठेही गेलो तरी विकासाचं बोलतो. काहीजण बेताल वक्तव्य करत असतात.
काहीजणांना फक्त नाटक आणि नौटंकी करता येते. परंतु, यातून काहीही साध्य होणार नाही. त्याचबरोबर यातून राज्याचं आणि जनतेचं भलं होणार नाही.
यावेळी बोलत असताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी शासन आपल्या दारी कार्यक्रमावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “सध्याचं सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेहमी म्हणत असतात.
सध्याचं सरकार जनतेच्या पाठीशी आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासनाने शासन आपल्या दारी हा कार्यक्रम सुरू केला आहे.
सरकार आणि नागरिकांना मधला दुरावा कमी करण्यासाठी राज्य सरकारने या प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले आहे. सर्वसामान्यांना लवकरात लवकर मदत मिळावी, त्याचबरोबर जनतेचे प्रश्न लवकरात लवकर सुटावे यासाठी सरकार आपल्या दारी आले आहे.”
महत्वाच्या बातम्या
- Maratha Reservation | मराठ्यांना आरक्षण मिळणार? जरांगेंचं उपोषण एका महिन्यासाठी मागे
- Maratha Reservation | आरक्षण पत्र मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही – मनोज जरांगे
- Nitesh Rane | कुठल्याच बाजूने उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे पुत्र वाटत नाही – नितेश राणे
- Keshav Upadhye | तोंड उघडलं की गटारगंगा; केशव उपाध्येंची भास्कर जाधवांवर टीका
- Rohit Pawar | राज्य सरकारच कंपनीला कंत्राटी पद्धतीने चालवायला द्या – रोहित पवार