Keshav Upadhye | तोंड उघडलं की गटारगंगा; केशव उपाध्येंची भास्कर जाधवांवर टीका

Keshav Upadhye | टीम महाराष्ट्र देशा: राज्याच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत असतात. याच पार्श्वभूमीवर भाजप आणि ठाकरे गट नेहमी आमने-सामने येतात.

अशात ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्यावर निशाणा साधला आहे.

भास्कर जाधव यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचा उल्लेख वेस्टइंडीजचा प्लेअर असा केला आहे. भास्कर जाधव यांच्या या टीकेला भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उत्तर दिलं आहे.

भास्कर जाधव यांच्या टीकेला केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी ट्विट करत प्रत्युत्तर दिलं आहे. ट्विट करत केशव उपाध्ये म्हणाले, “तोंड उघडले की गटारगंगा ! भास्कर जाधव यांची ख्याती संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे.

त्यांनी तोंड उघडले की गटारगंगा वाहत असते, याचा अनुभव असल्यामुळे त्यांच्या जवळपास कोणी फिरकत नाही. त्यांच्या पक्षाचे नेते सुद्धा त्यांना दोन हात दूर ठेवतात.

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी यांचा पक्ष वाढीसाठी असलेला धुमधडाका पाहून ‘मातोश्री’ चे डोळे दिपले असणार आणि भुंकण्यासाठी भास्कररावांचा पट्टा काढला असणार!

तुम्ही भुंकत राहा, दुसरे प्रवक्ते थुंकत राहतील, तुमच्या असल्या शिव्याशापांमुळे आमचा पक्ष जिंकत राहील ! काय करणार? गटाराचं तोंड तर धरू शकत नाही !”

How will a West Indian know the importance of the Thackeray family? – Keshav Upadhye

दरम्यान, ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर खोचक टीका केली. ते म्हणाले, “उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांना ते घर कोंबडे बोलतात ही त्यांची व्यक्तिगत टीका नाही का?

वेस्टइंडीजच्या माणसाला ठाकरे घराण्याचं महत्त्व काय कळणार? बाळासाहेब ठाकरे यांच्या घराण्यात उद्धव ठाकरेंनी जन्म घेणं म्हणजे कलंक आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं होतं.

ते कुठल्या भाषेत बोलतात. त्यांना आम्ही वेस्ट इंडिजचं बोललो तर लागतं. मात्र, ते आमच्या पक्षाप्रमुखावर टीका करतात. वेस्टइंडीजच्या त्या प्लेअरने आपल्या तोंडाला लगाम लावायला हवा.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.