Maratha Reservation | मनोज जरांगे उपोषण मागे घेणार? राज्य सरकारचं शिष्टामंडळ जरांगेंच्या भेटीला

Maratha Reservation | टीम महाराष्ट्र देशा: मनोज जरांगे (Manoj Jarange) मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी गेल्या पंधरा दिवसांपासून उपोषण करत आहे. जरांगे यांनी उपोषण मागे घ्याव, यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे.

मात्र, मनोज जरांगे आपल्या निर्णयावर ठाम आहे. आमची मागणी पूर्ण झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी स्पष्ट भूमिका जरांगे यांनी घेतली आहे.

याच पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर राज्य सरकारचं शिष्टमंडळ पुन्हा एकदा मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी जालन्यात दाखल झालं आहे.

Arjun Khotkar and Sandipan Bhumare have gone to meet Manoj Jarange

काल (11 सप्टेंबर) मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. सह्याद्री अतिथीगृह येथे ही बैठक पार पडली.

मराठा समाजाला अतिरिक्त आरक्षण देण्याबाबत या बैठकीत सर्व पक्षांचं एकमत झालं असल्याची माहिती मिळाली आहे. यानंतर अर्जुन खोतकर आणि संदिपान भुमरे पुन्हा एकदा मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी जालन्यात दाखल झाले आहे.

काल झालेल्या बैठकीतील निर्णयाबाबत मनोज जरांगे यांच्याशी या नेत्यांनी चर्चा केली आहे. उपोषण मागे घ्या, तब्येत सांभाळा अशी मागणी देखील या नेत्यांनी जरांगे यांना केली आहे.

दरम्यान, मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज पंधरावा दिवस आहे. उपोषणाच्या पंधराव्या दिवशी शिवप्रतिष्ठान स्वराज संस्थेचे प्रमुख आणि संस्थापक संभाजी भिडे आज उपोषण स्थळी दाखल झाले आहे. यावेळी त्यांनी जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.

“मनोज जरांगे हे आंदोलन स्वतःसाठी नाही तर समाज कल्याणासाठी करत आहे. त्यांच्या इच्छाशक्तीचं कौतुक करायला शब्द नाही. सध्याचं सरकार शब्द पाळणार आहे.

ते मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देतील. मनोज जरांगे यांचं आंदोलन यशस्वी ठरेल”, असं संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.