Maratha Reservation | जालना: राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चांगला रंगला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) गेल्या पंधरा दिवसापासून जालना जिल्ह्यामध्ये उपोषण करत आहे.
आज उपोषणाच्या पंधराव्या दिवशी शिवस्वराज प्रतिष्ठान संस्थेचे प्रमुख संभाजी भिडे (Sambhaji Bhide) उपोषण स्थळी दाखल झाले आहे.
संभाजी भिडे यांनी मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवला आहे. यानंतर जरांगे यांनी भिडे यांच्या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे.
Currently reservation is important for us – Maratha Reservation
मनोज जरांगे म्हणाले, “एकाचा पाठिंबा घ्यायचा आणि दुसऱ्याचा नाकरायचा हे आमचे धोरण नाही. आज संभाजी भिडे यांनी आमच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. त्यानंतर आमच्या ताकतीत वाढ झाली आहे.
कुणीही आलं तरी आम्ही त्यांचा पाठिंबा स्वीकारणारच आहोत. कारण त्यामुळे आमची ताकद वाढणार आहे. आमच्या पातळीवर आमचं आंदोलन सुरू आहे.
त्याचबरोबर या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी सरकार त्यांच्या परीने प्रयत्न करताना दिसत आहे. संभाजी भिडे आल्यानंतर आम्हाला बळ मिळालं आहे. सध्या आमच्यासाठी भावना नाही तर आरक्षण महत्त्वाचं आहे.”
दरम्यान, मनोज जरांगे यांच्या भेटीनंतर संभाजी भिडे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, “मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे.
जरांगे यांची मागणी पूर्ण होऊन मराठा समाजाला (Maratha Reservation) योग्य ते आरक्षण मिळणार. कारण सध्याचं सरकार शब्द पाळणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एवढ्या चांगल्या नेतृत्वाचं सरकार राज्यामध्ये नव्हतं, असं माझं मत आहे.
मनोज जरांगे यांचं आंदोलन यशस्वी ठरेल. जरांगे हे स्वतःसाठी आंदोलन करत नाही तर त्यांचं आंदोलन हे समाज कल्याणासाठी सुरू आहे. त्यांचं कौतुक करायला शब्द नाही.”
महत्वाच्या बातम्या
- Sambhaji Bhide | मराठा समाजाला शंभर टक्के योग्य ते आरक्षण मिळणार – संभाजी भिडे
- Sanjay Raut | “… म्हणून सरकारला जरांगेंचं उपोषण गुंडाळायचं”; संजय राऊतांचा राज्य सरकारवर हल्लाबोल
- Rohit Pawar | मनोज जरांगेंनी आपले उपोषण मागे घ्यायला हवे; रोहित पवारांची जरांगेंना कळकळीची विनंती
- Uddhav Thackeray | मोदींच्या पंगतीत लोकशाहीचे ताट रिकामे; ठाकरे गटाची मोदी सरकारवर टीका
- Maratha Reservation | मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार? सर्वपक्षीय बैठकीत नेमकं काय झालं