Share

Maratha Reservation | मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार? सर्वपक्षीय बैठकीत नेमकं काय झालं

🕒 1 min readMaratha Reservation | टीम महाराष्ट्र देशा: जालना जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. उपोषणकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) मराठ्यांच्या आरक्षणासाठी गेल्या पंधरा दिवसांपासून उपोषण करत आहे. मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावं, यासाठी सरकारने अनेक प्रयत्न केले. मात्र, सरकारचे सगळे प्रयत्न सफल ठरले आहे. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल (11 सप्टेंबर) … Read more

Published On: 

🕒 1 min read

Maratha Reservation | टीम महाराष्ट्र देशा: जालना जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. उपोषणकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) मराठ्यांच्या आरक्षणासाठी गेल्या पंधरा दिवसांपासून उपोषण करत आहे.

मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावं, यासाठी सरकारने अनेक प्रयत्न केले. मात्र, सरकारचे सगळे प्रयत्न सफल ठरले आहे. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल (11 सप्टेंबर) सर्वपक्षीय बैठक बोलावली होती.

OBC will not be affected

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे सर्वपक्षीय बैठक बोलावली होती.

या बैठकीमध्ये मराठा समाजाला अतिरिक्त आरक्षण देण्यावर सर्व पक्षांचं एकमत झालं असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नसल्याचं देखील या बैठकीत स्पष्ट करण्यात आलं आहे.

मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही. महाविकास आघाडीने मराठा समाजाला आरक्षणासाठी जो फॉर्मुला वापरला होता, तोच फॉर्मुला शिंदे-फडणवीस-पवार वापरणार असल्याचं या बैठकीत स्पष्ट करण्यात आलं आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू असताना मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी पुढे आली आहे. यानंतर ओबीसी समाज आक्रमक झाल्याचं दिसून आलं आहे.

याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी समाजावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही.

आरक्षणाबाबत ओबीसीने कोणत्याही प्रकारचा गैरसमज करून घेऊ नये. आमचं आरक्षण काढून घेतलं जाणार किंवा त्यामध्ये कोणीतरी वाटेकरी होणार अशी भीती ओबीसींच्या मनात आहे.

मात्र, असं काही होणार नाही. दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असा कोणताच निर्णय राज्य सरकार घेणार नाही. यासाठी आमचे प्रयत्न देखील सुरू आहे. त्यामुळे या मुद्द्यावर प्रतिक्रिया देत असताना प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!