Girish Mahajan | टीम महाराष्ट्र देशा: मराठा आरक्षणावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे. या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलं धारेवर धरलं आहे.
अशात गिरीश महाजन यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली आहे. थोडे दिवस थांबा उद्धव ठाकरेंसोबत कोणीही राहणार नाही, असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. गिरीश महाजन यांच्या या वक्तव्यानंतर भाजप आणि ठाकरे गटामध्ये नवा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
We have 90% support of Shivsena – Girish Mahajan
प्रसार माध्यमांशी बोलत असताना गिरीश महाजन (Girish Mahajan) म्हणाले, “आता पूर्ण शिंदे गट आमच्यासोबत आहे. शिवसेनेचा 90% पाठिंबा आम्हाला आहे. सामना वृत्तपत्र आता फक्त पुसायच्या कामाचे राहिला आहे.
सामना वृत्तपत्र कोणी वाचत का? आपण सामनाला एवढं महत्त्व का देतो? मला हेच कळत नाही. त्यांची पालखी उचलायला देखील कोणीच राहिलेलं नाही. त्यामुळे तुम्ही आमची पालखी उचलायचा विचार करू नका.
आमची पालखी उचलायला भरपूर लोक आहेत. मात्र, तुमचं आता काहीच उरलेलं नाही. थोड्या दिवसानंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत कोणीही राहणार नाही.”
दरम्यान, आज सकाळी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भारतीय जनता पक्षावर टीका केली.
ते म्हणाले, “हिंदुत्वाशी भारतीय जनता पक्षाला काही घेणं देणं नाही, असं राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं आहे. हा सर्व सत्तेसाठी सुरू असलेला खेळ आहे. देशातील जनतेचं देखील आता हेच मत होत चाललं आहे.
जातीय तेढ निर्माण करायची, दंगली घडून आणायच्या, इंडियाचं भारत करायचं याला हिंदुत्व म्हणता येत नाही. हिंदुत्व एक संस्कार आणि संस्कृती आहे.
हिंदू धर्म आतापर्यंत सर्वांना सोबत पुढे घेऊन गेला आहे. त्याचबरोबर हिंदू धर्म लोकशाही मानणारा आहे. मी हे सगळं संपून टाकलं आहे त्यामुळे तुम्हाला हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार नाही.”
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis | आपल्या आरक्षणात कुणी वाटेकरी होईल, असा ओबीसीने गैरसमज करू नये – देवेंद्र फडणवीस
- Eknath Shinde | मराठा समाजाने निर्णय घेण्यासाठी आम्हाला थोडा वेळ दिला पाहिजे – एकनाथ शिंदे
- Chandrashekhar Bawankule | ओबीसी आणि मराठा दोघांच्या हक्कांवर गदा येणार नाही – चंद्रशेखर बावनकुळे
- Maratha Reservation | मराठा आरक्षणावरून मनोज जरांगेंचं अजित पवारांना आवाहन; म्हणाले…
- Keshav Upadhye | काँग्रेस नेत्यांची कल्पनाशक्ती जिथे थांबते, तिथे मोदींची सुरू होते – केशव उपाध्ये