Share

Maratha Reservation | मराठा आरक्षणावरून मनोज जरांगेंचं अजित पवारांना आवाहन; म्हणाले…

🕒 1 min readMaratha Reservation | टीम महाराष्ट्र देशा: जालना जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) आंदोलन करत आहे. आज त्यांच्या आंदोलनाचा चौदावा दिवस आहे. मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावं, यासाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्न करत आहे. मात्र, सरकारचे सर्व प्रयत्न असफल होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी … Read more

Published On: 

🕒 1 min read

Maratha Reservation | टीम महाराष्ट्र देशा: जालना जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) आंदोलन करत आहे. आज त्यांच्या आंदोलनाचा चौदावा दिवस आहे.

मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावं, यासाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्न करत आहे. मात्र, सरकारचे सर्व प्रयत्न असफल होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी एक वक्तव्य केलं होतं.

मनोज जरांगे यांना समजावण्यात सरकार कमी पडत असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं होतं. अजित पवार यांच्या या वक्तव्यावर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Give reservation to Maratha community – Maratha Reservation

मनोज जरांगे म्हणाले, “आम्ही कमी पडलो, असं अजित पवार म्हणाले होते. त्यानंतर आता माझी त्यांना एक विनंती आहे की त्यांनी चार-पाच पक्षांना एकत्र घेऊन आरक्षणाचा विषय लावून धरला पाहिजे. त्याचबरोबर त्यांनी गोरगरिबांचं कल्याण करायला हवं.

मराठा समाजाला आरक्षण द्या, एवढीच आमची मागणी आहे. आमचा आक्रोश त्यांच्या लक्षात येतच असेल. त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर आम्हाला आरक्षण घ्यावं. आमचा आक्रोश घेऊन सर्वपक्षीय बैठकीला जा.

मराठा समाजाला आरक्षण मिळालं तर आम्ही तुमच्यासमोर नतमस्तक होऊ. त्याचबरोबर आमची मागणी पूर्ण झाली तर आम्ही तुमच्या समोर नाक घासायला देखील मागे-पुढे पाहणार नाही. सर्वपक्षीय नेते गोळा करून अजित पवारांनी गोरगरिबांना न्याय मिळवून द्यावा.”

दरम्यान, मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. सह्याद्री अतिथी गृह येथे आज संध्याकाळी 6.30 वाजता ही बैठक पार पडणार आहे.

या बैठकीला शरद पवार गटाचे राजेश टोपे उपस्थित राहणार आहे. तर ठाकरे गटाकडून विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि खासदार विनायक राऊत उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. या बैठकीनंतर मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार का? याकडं आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!