Eknath Shinde | टीम महाराष्ट्र देशा: एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेचे दोन गट पडले होते. यानंतर बंडखोर आमदारांच्या अपात्रतेचा विषय सर्वोच्च न्यायालयात जाऊन पोहोचला होता.
काही महिन्यांपूर्वी सुप्रीम कोर्टाने या प्रकरणावर निर्णय दिला होता. हा निर्णय घेण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्यावर सोपवला होता.
राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणात लवकरात लवकर निर्देश द्यावे, असं देखील सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं होतं. यानंतर या प्रकरणाबाबत मोठी माहिती समोर आली आहे. ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या आमदारांची प्रत्यक्ष सुनावणीची तारीख आता ठरली आहे.
The actual hearing of Shinde group and Thackeray group MLAs will be held on September 14
शिंदे गट (Eknath Shinde) आणि ठाकरे गट यांच्या आमदारांची प्रत्यक्ष सुनावणी 14 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता पार पडणार आहे. यामध्ये शिंदे गटातील 40 तर ठाकरे गटातील 14 आमदारांची सुनावणी होणार आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तब्बल 34 याचिकांवर एकाच दिवशी सुनावणी घेणार आहे. विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहामध्ये हा निर्णय होणार आहे. एकाच दिवशी दोन्ही गटातील आमदारांची सुनावणी होणार असल्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या आमदारांची प्रत्यक्ष सुनावणीची वेळ ठरलेली असताना राज्याच्या राजकारणाबाबत दुसरी आणखीन महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या उर्वरित म्हणजेच चौथ्या टप्प्याचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असल्याची माहिती मिळाली आहे. गणेशोत्सवापूर्वी हा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं बोललं जात आहे.
या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये तब्बल 14 मंत्री मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचं देखील म्हटलं जात आहे. याबाबत एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच बैठक झाली असल्याची माहिती मिळाली आहे.
महत्वाच्या बातम्या
- Maratha Reservation | मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार? CM शिंदेंनी आज बोलावली सर्वपक्षीय बैठक
- Uddhav Thackeray | मोदींच्या लुच्चेगिरीची 9 वर्ष देशाच्या नाकीनऊ आणणारी ठरली; ठाकरे गटाचा मोदींवर हल्लाबोल
- Cabinet Expansion | राजकीय हालचालींना वेग; राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली?
- Maratha Reservation | मराठा समाजाने माझ्या शब्दाच्या पुढे जाऊ नये – मनोज जरांगे
- Ajit Pawar | ओबीसी आरक्षणाला धक्का लागत असताना अजित पवार शांत का? – प्रकाश शेंडगे