🕒 1 min read
Maratha Reservation | जालना: मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचं गेल्या काही दिवसांपासून जालना जिल्ह्यात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे.
आमची मागणी पूर्ण झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असं मनोज जरांगे यांनी स्पष्ट सांगितलं आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने एक निर्णय जाहीर केला होता.
वंशावळी कुणबी अशी नोंद असलेल्या मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचं सरकारनं जाहीर केलं होतं. सरकारच्या या निर्णयातील वंशावळी शब्द हटवून सरसकट मराठ्यांना प्रमाणपत्र देण्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.
याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी मराठा समाजातील आंदोलकांना एक आवाहन केलं आहे. मराठा समाजाने माझ्या शब्दाच्या पुढे जाऊ नये, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.
People of Maratha community should protest peacefully – Manoj Jarange
मनोज जरांगे म्हणाले, “आपण राज्यातील मराठ्यांसाठी लढत आहोत. सरकारनं जर आपल्या मागणीप्रमाणे जीआर आणला नाही तर हे आमरण उपोषण सुरूच राहील.
मी तुमच्यापेक्षा मोठा नाही पण एक मुलगा म्हणून मी तुम्हा सर्वांना एक आवाहन करत आहे. माझ्या शब्दापुढे मराठा समाजाने जाऊ नये. राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची जबाबदारी आपण आपल्या खांद्यावर घेतली आहे.
ती जबाबदारी आपल्याला शांततेत पार पाडायची आहे. मराठा समाजातील नागरिकांनी शांततेत आंदोलन करावं, असं आवाहन मी त्यांना करत आहे.”
पुढे बोलताना ते म्हणाले, “मी संपूर्ण महाराष्ट्रासाठी आरक्षण द्या, ही मागणी करत आहे. यामध्ये कोणाला काहीच समज-गैरसमज होण्याचं कारण नाही.
मराठवाड्यासह महाराष्ट्रालाही फायदा द्या. 2004 मध्ये जो जीआर काढण्यात आला होता. त्यामध्ये सुधारणा करून मराठा समाजाला तात्काळ प्रमाणपत्र देण्यात यावं. यासाठी तातडीने जीआर काढून त्यावर अंमलबजावणी करा.”
महत्वाच्या बातम्या
- Ajit Pawar | ओबीसी आरक्षणाला धक्का लागत असताना अजित पवार शांत का? – प्रकाश शेंडगे
- Narendra Modi | PM मोदींसमोरील G-20 परिषदेतील नामफलक सोशल मीडियावर व्हायरल; नक्की काय आहे प्रकरण?
- Maratha Reservation | मराठ्यांना सरसकट आरक्षण द्या नाही तर उपोषण सुरूच राहणार – मनोज जरांगे
- Vijay Wadettiwar | ओबीसींचे हक्क कोणीही हिरावून घेऊ नये – विजय वडेट्टीवार
- Ajit Pawar | राज्य सरकार मनोज जरांगेंना समजवण्यात कमी पडतंय – अजित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











