Share

Ajit Pawar | ओबीसी आरक्षणाला धक्का लागत असताना अजित पवार शांत का? – प्रकाश शेंडगे

Ajit Pawar | मुंबई: महाराष्ट्रामध्ये सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगला पेटला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) जालन्यामध्ये उपोषण करत आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी समाजाचं प्रमाणपत्र देऊन त्यांचा ओबीसीत समावेश करा, अशी मागणी मराठा आंदोलकांनी केली आहे. याच पार्श्वभूमीवर ओबीसी जन मोर्चाचे अध्यक्ष प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) यांनी प्रतिक्रिया दिली … Read more

Published On: 

Ajit Pawar | मुंबई: महाराष्ट्रामध्ये सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगला पेटला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) जालन्यामध्ये उपोषण करत आहे.

मराठा समाजाला सरसकट कुणबी समाजाचं प्रमाणपत्र देऊन त्यांचा ओबीसीत समावेश करा, अशी मागणी मराठा आंदोलकांनी केली आहे. याच पार्श्वभूमीवर ओबीसी जन मोर्चाचे अध्यक्ष प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागू देता मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल, असं अजित पवार यांनी पूर्वी म्हटलं होतं. मग आता अजित पवार शांत का? असा सवाल प्रकाश शेंडगे यांनी उपस्थित केला आहे.

पत्रकार परिषदेत बोलत असताना प्रकाश शेंडगे म्हणाले, “काल रात्री राज्य सरकारची मनोज जरांगे यांच्या शिष्टमंडळासोबत उशिरापर्यंत बैठक झाली.

ओबीसीतून कुणबी म्हणून सरसकट मराठा समाजाला प्रमाणपत्र देण्यात यावं, याबाबत या बैठकीत चर्चा झाली असल्याची माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर मनोज जरांगे यांनी हीच भूमिका आज पत्रकार परिषदेतून स्पष्ट केली आहे.”

Why is Ajit Pawar quiet? – Prakash Shendge

पुढे बोलताना ते म्हणाले, “संपूर्ण मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीमधून आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचं समजलं आहे. यासाठी सरकारने रात्री अडीच वाजता जीआर काढला असल्याची माहिती मिळाली आहे.

परंतु, आमच्याकडे हा जीआर अजून पोहोचलेला नाही. मराठा समाजाने याआधी जेव्हा आरक्षणाची मागणी केली होती तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसीमध्ये कोणाला वाटेकर होऊ देणार नाही असं म्हटलं होतं.

ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागू देता मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल, असं अजित पवार यांनी पूर्वी म्हटलं होतं. मग आता अजित पवार (Ajit Pawar) शांत का?”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही