Vijay Wadettiwar | नागपूर: मराठा आरक्षणाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे जालना जिल्ह्यामध्ये गेल्या बारा दिवसांपासून उपोषण करत आहे.
यानंतर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी पुढे आल्यानं ओबीसी नेते आक्रमक झाले आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास ओबीसी नेत्यांनी विरोध दर्शवला आहे.
याच पार्श्वभूमीवर विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ओबीसींचे हक्क कोणीही हिरावून घेऊ नये, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
No one should interfere with the rights of OBCs – Vijay Wadettiwar
प्रसारमाध्यमांशी बोलत असताना विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले, “ओबीसी समाजाचं उद्या आंदोलन होणार आहे. त्यांच्या या आंदोलनाला आमचा पाठिंबा असेल. ओबीसी कार्यकर्ता म्हणून मी त्या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे.
जिथे-जिथे ओबीसींचे प्रश्न उपस्थित होतील, तिथे-तिथे मी उभा राहील. ओबीसींचे हक्क कोणीही हिरावून घेऊ नये. ओबीसींच्या हक्कांमध्ये कुणीही वाटेकरी होऊ नये, ही आमची स्पष्ट भूमिका आहे.
कुणाला जर आरक्षण द्यायचं असेल, तर घटना दुरुस्ती करून त्यांना आरक्षण द्या. मात्र, ओबीसीच्या आरक्षणातून कुणी त्यांना आरक्षण देण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याला आम्ही विरोध करणार आहोत. मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे.
पुढे बोलताना ते (Vijay Wadettiwar) म्हणाले, “सरसकट मराठा समाजाला संवैधानिक पद्धतीने आरक्षण देता येत नाही, हे स्पष्ट आहे. तरी पण त्यांची ही आग्रही मागणी आहे.
पूर्वी वंशावळीचा जीआर काढण्यात आला होता. तसाच जीआर राज्य सरकारने यावेळी सुद्धा काढला आहे. वंशावळीमध्ये काही गडबड होत असेल तर त्याचा आम्ही विरोध करू.
वंशावळीत मराठवाड्यातील कुणबी समाज येत असेल तर त्यांना प्रमाणपत्र देण्यास आमचा काही विरोध नाही. त्याला विरोध करायला काहीच कारण नाही.”
महत्वाच्या बातम्या
- Ajit Pawar | राज्य सरकार मनोज जरांगेंना समजवण्यात कमी पडतंय – अजित पवार
- Sanjay Raut | G-20 परिषद आहे की मोदी 20-20 आहे? – संजय राऊत
- Sadabhau Khot | मराठा समाजाची शरद पवारांनी माती केली – सदाभाऊ खोत
- Pankaja Munde | ओबीसी आणि मराठ्यांमध्ये भांडण लावू नका – पंकजा मुंडे
- Maratha Reservation | मराठा उपोषणकर्त्यांची प्रकृती अत्यंत खालावली; आणखीन एक मराठा आंदोलन पेटणार?