Sanjay Raut | मुंबई: दिल्लीमध्ये G-20 परिषद (G-20 summit) होणार आहे. या परिषदेसाठी जगभरातील महत्त्वाच्या देशांचे प्रमुख भारतात आले आहे.
याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर खोचक टीका केली आहे. G-20 परिषद आहे की मोदी 20-20 आहे? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
Heads of all nations have arrived in Delhi for the G-20 summit – Sanjay Raut
संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “G-20 परिषदेसाठी सर्व राष्ट्रांचे प्रमुख दिल्लीमध्ये दाखल झाले आहे. हे भारतात पहिल्यांदा घडत नाहीये.
इंदिरा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना भारतात अशा प्रकारच्या बैठका झाल्या होत्या. आंतरराष्ट्रीय स्तरावर या बैठका खूप महत्त्वाच्या मानल्या जातात.
मात्र, या परिषदेसाठी किती पैसा खर्च झाला आहे? यासाठी ज्यांनी आपली जमीन दिली आहे, ती परत मिळणार आहे का? त्याचबरोबर या परिषदेनंतर भारतावरील कर्ज माफ होणार का? सध्या होणारी परिषद G-20 परिषद आहे की मोदी 20-20 आहे? असा सवाल उपस्थित झाला आहे.”
पुढे बोलताना ते (Sanjay Raut) म्हणाले, “चीनचे राष्ट्राध्यक्ष मिस्टर पुतिन या परिषदेसाठी भारतात आले नाही. त्यांनी भारतातल्या काही भागावर अतिक्रमण केलं आहे. याकडं आपण सर्वांनी लक्ष द्यायला हवं.
या बैठकीच्या माध्यमातून गेलेली जमीन परत मिळणार आहे का? असं जर होणार असेल तर या बैठकीचं आम्ही आनंदाने स्वागत करू. या बैठकीने जर आपल्या देशाची ताकद वाढणार असेल तर त्याचं देखील नक्की स्वागत करू.
या बैठकीतून नेमकं काय साध्य होणार आहे? याकडं आमचं सर्वांचं लक्ष आहे. या परिषदेमध्ये लोकशाहीची फार मोठी तुतारी वाजवली जात आहे.
मात्र, या बैठकीतील जेवणाच्या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांना बोलावलं नव्हतं. यासाठी सत्ताधाऱ्यांचं मन मोठं असावं लागतं. मात्र, सत्ताधाऱ्यांच्या मनात विरोधकांबद्दल द्वेष भरला आहे आणि हे अत्यंत चुकीचं आहे.”
महत्वाच्या बातम्या
- Sadabhau Khot | मराठा समाजाची शरद पवारांनी माती केली – सदाभाऊ खोत
- Pankaja Munde | ओबीसी आणि मराठ्यांमध्ये भांडण लावू नका – पंकजा मुंडे
- Maratha Reservation | मराठा उपोषणकर्त्यांची प्रकृती अत्यंत खालावली; आणखीन एक मराठा आंदोलन पेटणार?
- Radhakrishna Vikhe Patil | धनगर कार्यकर्त्यांना मारहाण करणं पडलं महाग; विखे पाटलांविरुद्ध धनगर समाज आक्रमक
- Shambhuraj Desai | मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत सर्व सोयी सुविधा देणार – शंभूराजे देसाई