Shambhuraj Desai | मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत सर्व सोयी सुविधा देणार – शंभूराजे देसाई

Shambhuraj Desai | टीम महाराष्ट्र देशा: मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी जालना जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून तीव्र आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचे पडसाद राज्याच्या राजकीय वर्तुळात देखील दिसून आले आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. त्याचबरोबर इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सोडवला जाईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

अशात शंभूराज देसाई यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला सर्व सोयी सुविधा देणार असल्याचं शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे.

Uddhav Thackeray was the online Chief Minister – Shambhuraj Desai

शंभूराज देसाई म्हणाले, “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कधीच शेतकऱ्यांची प्रश्न सोडवण्यासाठी बांधावर गेले नाही. उद्धव ठाकरे ऑनलाईन मुख्यमंत्री होते. तर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली सरकार दीड लाख लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलं आहे.

मराठा समाज आरक्षण आणि दुष्काळाबाबत आमचं सरकार अत्यंत संवेदनशील आहे. या समस्या कशा सोडवता येईल? यासाठी आमचं नियोजन सुरू आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत सर्व सोयी सुविधा दिल्या जाणार आहे.”

पुढे बोलताना ते म्हणाले, “उद्धव ठाकरे जाणीवपूर्वक राज्य सरकारवर टीका करत असतात. जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा आमचा त्यामध्ये समावेश होता.

प्रत्येक जिल्ह्यात जाऊन आपण तेथील प्रश्न सोडवू, असं उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना म्हटलं होतं. त्यावेळी त्यांनी आमचं ऐकलं नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तळागाळापर्यंत पोहोचले आहे.

त्याचबरोबर त्यांनी सरकारी योजना गावागावात पोहोचल्या आहे. आमच्या योजना आणि उपक्रमांकडे जनतेचं लक्ष आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आमच्यावर टीका करत आहे.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.