Sharad Pawar | टीम महाराष्ट्र देशा: 02 जुलै 2023 रोजी राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला होता. या दिवशी अजित पवार शरद पवारांना सोडून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले होते.
अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले. यानंतर अजित पवारांनी आपणच राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचं सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर आणि नावावर दावा केला होता.
यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार आणि अजित पवार दोन्ही गटाला नोटीस पाठवून स्पष्टीकरण मागितलं होतं. त्यानुसार शरद पवार गटानं ईमेलद्वारे निवडणूक आयोगाला स्पष्टीकरण सादर केलं आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाने अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरचा दावा फेटाळून लावला आहे.
अजित पवार सत्तेत सामील होताच त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची आणि त्यांच्यासह आलेल्या 09 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्यासह शपथ घेणाऱ्या 09 आमदारांच्या विरोधात अपात्रतेची कारवाई करावी अशी मागणी शरद पवार गटाने यापूर्वीच केली होती.
त्यानंतर आता शरद पवार गटाने नवीन मागणी केली आहे. अजितदादा यांच्यासह 40 बंडखोर आमदारांना अपात्र करा अशी मागणी शरद पवार गटाकडून करण्यात आली आहे.
Who will get the symbol of NCP?
दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्ह आणि नावाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. राष्ट्रवादीचे चिन्ह कोणाला मिळणार?
या प्रश्नाचं उत्तर देत जयंत पाटील म्हणाले, “शिवसेनेच्या बाबतीत जे घडलं तेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत घडत आहे. आमच्यातील काही लोक शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत.
त्यानंतर त्या लोकांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर आणि नावावर दावा ठोकला आहे. त्यांचा दावा तुम्ही सर्वांनी टीव्हीवर पाहिलाच असेल. निवडणूक आयोगाने त्यांना स्वीकारलेलं असून पक्षाचं नाव आणि चिन्ह त्यांच्याकडे जाणार, असं आम्हाला वाटायला लागलं आहे. मात्र, यावेळी जनता हे सर्व खपवून घेणार नाही. भाजपला यासाठी मोठ्या विरोधाला सामोरं जावं लागणार आहे.”
महत्वाच्या बातम्या
- Deepak Kesarkar | मराठा आंदोलनादरम्यान झालेल्या दगडफेकीमागे कट असण्याची शक्यता – दीपक केसरकर
- Prakash Ambedkar | काँग्रेस आणि राष्ट्रवादी राजकारणात अस्पृश्यता पाळतात – प्रकाश आंबेडकर
- Radhakrishna Vikhe Patil | पवित्र भंडारा माझ्यावर उधळला याचा मला आनंद – राधाकृष्ण विखे पाटील
- Maratha Reservation | माझ्या बाळाला न्याय द्या; मराठा आरक्षणावर मनोज जरांगेंच्या आईची भावूक प्रतिक्रिया
- Radhakrishna Vikhe Patil | उद्धव ठाकरेंना शेतकऱ्यांच्या बांधावर जाणं मनोरंजक वाटतं – राधाकृष्ण विखे पाटील