Prakash Ambedkar | काँग्रेस आणि राष्ट्रवादी राजकारणात अस्पृश्यता पाळतात – प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar | टीम महाराष्ट्र देशा: आगामी निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांच्या एनडीएला टक्कर देण्यासाठी विरोधकांनी इंडिया नावाची आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीमध्ये देशातील बहुतांश विरोधी पक्षांचा समावेश आहे.

मात्र, विरोधकांच्या या आघाडीमध्ये महाराष्ट्रातील वंचित बहुजन आघाडी पक्ष सामील झालेला नाही. वंचित बहुजन आघाडीची उद्धव ठाकरे गटासोबत युती आहे. मात्र, ते महाविकास आघाडीचा भाग नाही.

याच पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघेही राजकारणात अस्पृश्यता पाळतात, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

We are treated as untouchables even in politics – Prakash Ambedkar

ट्विट करत प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले, “आम्हाला फक्तं समाजातच अस्पृश्य म्हणून वागवलं जात नाही, तर राजकारणातही अस्पृश्य म्हणूनच वागवलं जातं.

भाजप-आरएसएसचा उगम होताच सनातन धर्म मानणारे आणि त्याचे प्रचारक असणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघेही राजकारणात अस्पृश्यता पाळायला लागले आहेत.

#IndiaAlliance मध्ये येण्यासाठी निमंत्रणाची गरज नव्हती, तर इतर पक्षांना निमंत्रणे का वाटत फिरत होतात? लालू प्रसाद यादव आणि स्टॅलिन या शूद्रांमधल्या मोठ्या समाजवादी नेत्यांशिवाय तुमच्या आघाडीची गाडी अडली नसती, तर त्यांना तुम्ही निमंत्रण दिले असते का याबद्दल मला शंकाच आहे.”

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी विरोधकांच्या इंडिया आघाडीची मुंबईमध्ये बैठक पार पडली होती. या बैठकीला देशासह महाराष्ट्रातील बहुतांश विरोधी पक्षाच्या नेत्यांनी हजेरी लावली होती.

मात्र, या बैठकीचं वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण देण्यात आलं नव्हतं. पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला धारेवर धरलं असल्याचं बोललं जात आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.