Pankaja Munde | सोलापूर: राज्यामध्ये सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटून उठला आहे. मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यामध्ये गेल्या अकरा दिवसांपासून तीव्र आंदोलन सुरू आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर सरकारकडून पावलं उचलली जात आहे. अशात या मुद्द्यावर आता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणं संवैधानिक दृष्ट्या शक्य नाही, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
We support Maratha reservation – Pankaja Munde
प्रसार माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या, “ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं, अशी मराठा समाजाची मुळात मागणी नव्हती. आम्हाला आरक्षण द्या, अशी मराठा समाजाची साधी आणि प्रामाणिक मागणी होती.
त्यांच्यातील जो समाज मुख्य प्रवाहापासून वंचित राहिलेला आहे, त्यांना आरक्षण देण्यासाठी सर्वांनी मान्यता दिली होती. गोपीनाथ मुंडेपासून ते आतापर्यंत असलेल्या सर्व नेत्यांनी या मागणीला मान्यता दिली होती.
मराठा आरक्षणाला आमचं समर्थन आहे. पण ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण द्या, असं कोण म्हटलं आहे? हे संवैधानिक दृष्ट्या शक्य नाही.”
पुढे बोलताना त्या (Pankaja Munde) म्हणाल्या, “मराठा समाजाला खरं खरं आरक्षण हवं आहे. माझी हात जोडून मराठा समाजातील युवकांना विनंती आहे की तुमची जी मागणी आहे, ती तुम्ही करा. संवैधानिक अधिकाराप्रमाणे तुम्ही ती मागणी करा.
मात्र, या मागणीसाठी तुम्ही आत्महत्या वगैरे करू नका. छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण वंशज आहोत. आपण त्यांच्या विचारधारेवर चालणारे आहोत. कोणतीही मागणी पूर्ण करण्यासाठी स्वतःचा जीव देऊ नका, अशी माझी सर्व मराठा युवकांना विनंती आहे.”
महत्वाच्या बातम्या
- Jayant Patil | राष्ट्रवादीचं चिन्ह कोणाला मिळणार? जयंत पाटील म्हणतात…
- Radhakrishna Vikhe Patil | धनगर आरक्षणाचा मुद्दा तापणार? कार्यकर्त्यांनी राधाकृष्ण विखे पाटलांवर उधळला भंडारा
- Girish Mahajan | मी सांगितलेला आकडा परफेक्ट असतो, आम्ही 48 जागा जिंकणार – गिरीश महाजन
- Maratha Reservation | उद्या सरकारचा निरोप न आल्यास सलाईन काढणार – मनोज जरांगे
- Ambadas Danve | राज्यात दुष्काळ अन् भाजपला निवडणुकीची चिंता; अंबादास दानवे यांचा भाजपला टोला