Ambadas Danve | टीम महाराष्ट्र देशा: आगामी निवडणुकांसाठी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. यासाठी सर्व पक्षांचे प्रमुख राज्यभर दौरे करताना दिसत आहे.
याच पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाने एक विशेष बैठक आयोजित केली आहे. यावरून विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भारतीय जनता पक्षावर खोचक टीका केली आहे. भाजपला जनतेशी काही घेणं देणं नाही, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.
BJP has nothing to do with people’s issues – Ambadas Danve
प्रसार माध्यमांशी बोलत असताना अंबादास दानवे म्हणाले, “भारतीय जनता पक्ष फक्त निवडणुका लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठी निर्माण झालेला पक्ष आहे. भाजपला जनतेच्या प्रश्नांशी काही घेणं देणं नाही.
एकीकडे भारतीय जनता पक्ष उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना घर कोंबडा आणि ऑनलाईन म्हणतं असतो. उद्धव ठाकरेंना शेतकऱ्यांचे प्रश्न माहित आहे की नाही? असं भारतीय जनता पक्ष म्हणत असतो.
परंतु, सध्या शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर उतरले आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही आमच्या सर्व बैठका पुढे ढकलल्या आहे.
कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये राजकारण महत्त्वाचं नाही. सध्या शेतकऱ्यांना आणि जनतेला आधार देण्याची गरज आहे. मात्र भारतीय जनता पक्षाला लोकसभा निवडणुकीची चिंता सतावत आहे.”
दरम्यान, या मुद्द्यावरून ठाकरे गटानं सामना अग्रलेखाच्या माध्यमातून राज्य सरकारवर खोचक टीका केली आहे. राज्यातील धरणांमध्ये सरासरी 42 टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत जाईल. नगरसारख्या जिल्हय़ात आताच दीड लाख लोक टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत.
राज्यातील 358 पैकी 264 तालुक्यांत दुष्काळाचा वणवा आहे. अशाने शाळा बंद पडतील. लहान उद्योग थांबतील. गावांचे स्थलांतर होईल. या गंभीर स्थितीतून मार्ग काढणारी इच्छाशक्ती आज राज्यकर्त्यांत दिसत नाही.
मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांत जनतेला सामोरे जाण्याचे धाडस नाही. एकंदरीत महाराष्ट्रातील दुष्काळाची स्थिती चिंताजनक आहेच. त्यात अकलेचाही दुष्काळ पडल्याने मार्ग निघणे अवघड झाले आहे, असं आजच्या सामना अग्रलेखात म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Uddhav Thackeray | मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांमध्ये जनतेला सामोरे जाण्याचे धाडस नाही; ठाकरे गटाचा राज्य सरकारवर हल्लाबोल
- Sambhajiraje Chhatrapati | आगामी निवडणुकांसाठी संभाजीराजे छत्रपतींची जोरदार तयारी! करणार दोन दिवसांचा नाशिक दौरा
- Bacchu Kadu | दिव्यांगांना निधी दिला नाही, तर राज्य सरकारच्या विरोधात उपोषण करू – बच्चू कडू
- Radhakrishna Vikhe Patil | मनोज जरांगे यांनी आरक्षणाचा मुद्द्या जास्त ताणू नये – राधाकृष्ण विखे पाटील
- Pankaja Munde | मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे – पंकजा मुंडे