Share

Pankaja Munde | मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे – पंकजा मुंडे

🕒 1 min read Pankaja Munde | सांगली: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) उपोषणाला बसले आहे. त्यांच्या उपोषणाचा आज दहावा दिवस आहे. अशात या मुद्द्यावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, असं पंकजा मुंडे यांनी … Read more

Published On: 

🕒 1 min read

Pankaja Munde | सांगली: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) उपोषणाला बसले आहे.

त्यांच्या उपोषणाचा आज दहावा दिवस आहे. अशात या मुद्द्यावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

Maratha community will have to be given reservation through constitutional way – Pankaja Munde

पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या, “संवैधानिक मार्गानं मराठा समाजाला आरक्षण द्यावं लागणार आहे. कोणत्याही घोषणा करून आरक्षण मिळत नाही.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी एक अभ्यास गट स्थापन करून योग्य तो आकडा ठरवला पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. यासाठी अभ्यासक कमिटी निवडून योग्य तो निर्णय घ्यायला हवा.

या कमिटीच्या निर्णयामध्ये कोणताही राजकीय हस्तक्षेप नसावा. मराठा समाजाला विश्वासात घेऊन आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढायला हवा. ओबीसीतून आरक्षण देणं शक्य नाही, असं छगन भुजबळ, नाना पटोले आणि माझी भूमिका आहे.”

दरम्यान, दोन महिन्याच्या राजकीय ब्रेकनंतर पंकजा मुंडे (Pankaja Munde) पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाल्या आहे. यानंतर त्यांनी राज्यात शिवशक्ती यात्रा काढली आहे.

या यात्रेदरम्यान त्या विविध जिल्ह्यातील देवस्थानांना भेट देत आहे. आज सकाळी पंकजा मुंडे कोल्हापूरमध्ये दाखल झाल्या होत्या. कोल्हापूरमध्ये त्यांनी अंबाबाईचे दर्शन घेतलं.

आपल्याला कुणाच्या दारात जाण्याची वेळ येऊ नये. त्याचप्रमाणे लोकांना देखील कुणाच्या दारात जावं लागू नये, असं साकडं मी देवीला घातलं असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही