Supriya Sule | टीम महाराष्ट्र देशा: जुलै महिन्याच्या सुरुवातीला राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला होता. 02 जुलै 2023 रोजी अजित पवार (Ajit Pawar) शरद पवारांना (Sharad Pawar) सोडून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले.
अजित पवार यांनी गेलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले आहे. यानंतर दोन्ही गट एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसले आहे.
अशात आता राष्ट्रवादीच्या फुटीवर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित दादा पुन्हा राष्ट्रवादीत येतील का? या प्रश्नाचं खासदार सुप्रिया सुळे यांनी सुचक उत्तर दिलं आहे.
There is no split in the NCP – Supriya Sule
अजित दादा पुन्हा राष्ट्रवादीत येतील का? या प्रश्नाचं उत्तर देत सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, “बारामतीची साखर तुमच्या तोंडात पडो. सध्या दोन भाऊ वेगवेगळ्या रो हाऊसमध्ये राहत आहे. त्यांच्यामध्ये फक्त एक कंपाउंड आहे.
सध्या सुरू असलेली लढाई वैचारिक आहे. निवडणुका जवळ आल्या की ती राजकीय लढाई होईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडलेली नाही. शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष असून जयंत पाटील हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहे.”
सध्या जालना जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला असल्याची घटना घडली आहे. यावेळी बोलत असताना सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी या घटनेवर देखील प्रतिक्रिया दिली आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, “जालना जिल्ह्यामध्ये घडलेल्या घटनेला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) जबाबदार आहे. सत्ताधारी पक्षाला दुष्काळ आणि मराठा आरक्षणाबाबत विरोधकांशी चर्चा केली पाहिजे.
सत्ताधारी पक्ष विरोधकांच्या मागे तपास यंत्रणा लावण्यात आणि पक्ष फोडण्यात व्यस्त आहे. महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट कोसळलं आहे. त्याचबरोबर राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. या मुद्द्यावर सत्ताधारी विरोधकांशी चर्चा करायला घाबरतात.”
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Raut | सनातन धर्माबाबत उदयनिधी स्टॅलिन यांचं वैयक्तिक मत असू शकतं – संजय राऊत
- Eknath Shinde | मुख्यमंत्री शिंदेंचा काँग्रेसला दणका! नांदेडमध्ये बड्या नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
- Rohit Pawar | CM शिंदेंनी मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसू नये – रोहित पवार
- Maratha Reservation | मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; उपोषणस्थळी डॉक्टरांची टीम दाखल
- Rohit Pawar | नाव बदलून प्रश्न सुटत असतील तर हुकूमशाहीला लोकशाही म्हणायला हवं – रोहित पवार