Rohit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: सध्या देशाच्या नावावरून देशातील राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे. देशाचं नाव इंडिया रद्द करून फक्त भारत हेच ठेवावं अशी चर्चा सुरू आहे.
या मुद्द्याला अनेकांनी पाठिंबा दर्शवला आहे. तर विरोधकांनी या मुद्द्यावरून केंद्र सरकारला धारेवर धरलं आहे. केंद्र सरकारच्या विशेष अधिवेशनामध्ये विधेयक मांडून घटनेमधून इंडिया शब्द हटवला जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अशात या प्रकरणावर आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नाव बदलून प्रश्न सुटत असतील तर हुकूमशाहीला लोकशाही म्हणायला हवं, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
ट्विट करत रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, “नाव बदलून प्रश्न सुटत असतील तर गरिबीला श्रीमंती, बेरोजगार युवकाला नोकरीवाला, महागाईला स्वस्त, भ्रष्टाचाराला सुशासन, खराब रस्त्यांना चकाचक रस्ते, आत्महत्येला इच्छामरण, हुकुमशाहीला लोकशाही म्हणायला हवं.
देशाच्या मुलभूत समस्या सोडवण्यात आलेले अपयश लपवण्यासाठी भावनिक राजकारण करायचे आणि देशाचे मूळ मुद्दे चर्चेतून बाजूला सारायचे हाच एकमेव अजेंडा हे सरकार चालवत आहे.
त्यामुळे महागाई ,बेरोजगारी, शिक्षण, दुष्काळ या विषयांना प्राधान्य द्यावे की नाव बदलण्याच्या चर्चेला प्राधान्य द्यावं, हे आता जनतेनेच ठरवायला हवं.
मीडिया व सर्वच विरोधी पक्षातील नेत्यांनी मूळ मुद्द्यांना बाजूला सारण्याचा सरकारच्या या जाळ्यात न अडकता मूळ मुद्द्यांवरच चर्चा करायला हवी ही विनंती .”
नाव बदलून प्रश्न सुटत असतील तर गरिबीला श्रीमंती, बेरोजगार युवकाला नोकरीवाला, महागाईला स्वस्त, भ्रष्टाचाराला सुशासन, खराब रस्त्यांना चकाचक रस्ते, आत्महत्येला इच्छामरण, हुकुमशाहीला लोकशाही म्हणायला हवं.
देशाच्या मुलभूत समस्या सोडवण्यात आलेले अपयश लपवण्यासाठी भावनिक राजकारण करायचे…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 7, 2023
Our name is Bharat – Pankaja Munde
दरम्यान, या मुद्द्यावर भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, “भारताचं इंडिया हे नाव झालं आहे. आपलं नाव भारत आहे.
त्या काळामध्ये कॉलनीयन लोकांनी इंडिया हे नाव दिलेलं आहे. बॉम्बेचं जसं मुंबई होऊ शकतं, त्याचप्रमाणे इंडियाचं भारत होऊ शकतं, अशी चर्चा सुरू आहे. या मुद्द्यावर देशातील लोक काय प्रतिक्रिया देतील? त्यांच्या प्रतिक्रियेनंतर या संदर्भात निर्णय होईल.”
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Raut | राज्य सरकार घर कोंबड्यासारखं घरात बसलयं – संजय राऊत
- Uddhav Thackeray | भाजपचे हिंदुत्व ढोंगी; ठाकरे गटाचा भाजपवर हल्लाबोल
- Sanjay Raut | मी दडपशाहीचा धिक्कार करतो; किरीट सोमय्या व्हिडिओ प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रिया
- Girish Mahajan | गिरीश महाजन म्हणजे संकटमोचक, हे खरं आहे – मनोज जरांगे
- Ambadas Danve | फक्त माफी मागून चालणार नाही तर फडणवीसांनी राजीनामा द्यायला हवा – अंबादास दानवे