Share

Uddhav Thackeray | भाजपचे हिंदुत्व ढोंगी; ठाकरे गटाचा भाजपवर हल्लाबोल

🕒 1 min read Uddhav Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजप आणि ठाकरे गट नेहमी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसतात. या मुद्द्यावरून ठाकरे गटानं पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. या प्रकरणावरून ठाकरे गटानं सामना अग्रलेखाच्या माध्यमातून भाजपवर खोचक टीका केली आहे. जगातील कोणताही धर्म निर्दोष नाही. भाजपचे हिंदुत्व जसे ढोंगी … Read more

Published On: 

🕒 1 min read

Uddhav Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजप आणि ठाकरे गट नेहमी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसतात. या मुद्द्यावरून ठाकरे गटानं पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे.

या प्रकरणावरून ठाकरे गटानं सामना अग्रलेखाच्या माध्यमातून भाजपवर खोचक टीका केली आहे. जगातील कोणताही धर्म निर्दोष नाही. भाजपचे हिंदुत्व जसे ढोंगी तसे ढोंग सर्वच धर्मात आहे.

सनातन धर्म गाईला देवता-माता मानतो. वीर सावरकरांना गोमातेचे थोतांड मान्य नाही. बाळासाहेब ठाकरे हिंदुहृदयसम्राट, पण त्यांनीही स्पष्टच सांगितले, शेंडी-जानव्याचे, घंटा बडवणाऱ्यांचे हिंदुत्व आपल्याला मान्य नाही याउलट भाजपचे आहे, असं आजच्या सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

Read Samana Editorial

जगातील कोणताही धर्म निर्दोष नाही. भाजपचे हिंदुत्व जसे ढोंगी तसे ढोंग सर्वच धर्मात आहे. सनातन धर्म गाईला देवता-माता मानतो. वीर सावरकरांना गोमातेचे थोतांड मान्य नाही.

बाळासाहेब ठाकरे हिंदुहृदयसम्राट, पण त्यांनीही स्पष्टच सांगितले, शेंडी-जानव्याचे, घंटा बडवणाऱ्यांचे हिंदुत्व आपल्याला मान्य नाही याउलट भाजपचे आहे. ते निवडणुकीत राम- बजरंग बली आणतात व लोकसभेत राजेशाहीचे प्रतीक म्हणून ‘सेंगोल’ आणतात हे विज्ञान नसून रूढीवाद आणि हुकूमशाही आहे.

समाजाला जुन्याच परंपरांत अडकवणारा ‘सनातनी विचार नव्या पिढीस मान्य नाही. धर्म तसाच राहील जुनाट परंपरा, रूढी, विषमतेची जळमटे गळून पडतील. उदयनिधी स्टालिन, रशियात लेनीन आणि स्टॅलिनचा विचारही टिकला नाही. त्यांचे पुतळे लोकांनी तोडले, पण हिंदुस्थानात सनातन धर्म आहे. राहील!

हिंदू धर्म हा एक पृथ्वीतलावरील सगळयात जुना धर्म आहे. 5 हजार वर्षांपूर्वी हा धर्म स्थापन झाला. अनेक संकटे, वादळे, घाव अंगावर झेलून या धर्माची पताका फडकत आहे. त्यासाठी महाभारत काळापासून अगणित लोकांनी बलिदाने दिली आहेत.

तलवारीच्या आणि तागडीच्या जोरावर हा सनातन धर्म बिकलांग करण्याचा प्रयत्न झाला, पण धर्माची पताका फडकत आहे. त्यामुळे तामीळनाडूचे एक मंत्री उदयनिधी स्टालिन यांनी सनातन धर्माविषयी तोडलेले तारे अज्ञानाच्या अंधारात लुप्त झाले आहेत उदयनिधी काय म्हणाले? “सनातन धर्म सामाजिक न्याय आणि समानतेच्या विरोधात आहे.

काही गोष्टींचा विरोध करता येत नाही, त्यांना संपवूनच टाकावे लागते. आपण डेंग्यू, डास, मलेरिया किंवा कोंबनाचा विरोध करू शकत नाही ते आपल्याला संपवायचे आहेत अशाच पद्धतीने आपल्याला सनातन धर्मालाही संपवायचे आहे.”

उदयनिधी यांचे हे विधान त्यांच्या ‘द्रविडी भूमिकेशी तर्कसंगत असले तरी देशातील 80-90 कोटी हिंदूच्या भावनांना ठेच पोहोचवणारे आहे भारतीय जनता पक्ष व त्याच्या बजरंगी बगलबच्च्यांना तर उदयनिधींच्या वक्तव्याने उकळयाच फुटल्या.

उदयनिधींना उत्तर त्याच भाषेत द्यायला हवे ते देण्याचे सोडून ‘इंडिया’ आघाडी आता उदयनियाँवर काय भूमिका घेणार? शिवसेनेचे यावर काय धोरण आहे? वगैरे प्रश्न विचारले गेले.

शिवसेनेची भूमिका ही जुनी जाणती म्हणजे ‘गर्व से कहो हम हिंदू हैं हीच आहे व राहणार ममता बॅनर्जीपासून केजरीवाल, कॉंग्रेस वगैरे लोकांनीही उदयनिधींच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

दोष तर सर्वच धर्मात आहेत, पण हिंदू धमनि हे दोष दूर करण्यासाठी सतत प्रयत्न केले. सतीची चाल, अस्पृश्यता, विषमता, स्त्री शिक्षण अशा अनेक विषयावर हिंदू धमनि प्रगतशील भूमिका घेतली.

डॉ. आंबेडकरांनी त्यांच्या लाखो बांधवांसह हिंदू धर्माचा त्याग केला. धर्मातील स्पृश्य-अस्पृश्यता आणि रूढी-परंपरेच्या विरोधात त्यांनी बंड केले या बंडापासून सनातन धमनि धडा घेतला व सामाजिक न्यायाचे तत्त्व स्वीकारले.

धर्म जागच्या जागीच आहे, पण अस्पृश्यता, रूढी परंपरांना मलेरिया, डेंग्यूप्रमाणे आपण खतम केले. उदयनिधी स्टालिन यांनी सनातन धर्माचा हा इतिहास समजून घेतला पाहिजे दुसरे असे की, द्रविड विरुद्ध सनातन हा संघर्षाचा इतिहासही जुनाच आहे. त्याच संघर्षातून दक्षिणी लोकांचा हिंदी विरोध वाढला.

ते हिंदू धर्म, त्यांचे देव, परंपरा मानायला तयार नाहीत ‘द्रविडी पक्षाचा पायाच ब्राह्मणवादाच्या विरोधाचे प्रतीक म्हणून घालण्यात आला द्रविडी लोकांचे अंत्यसंस्कार हे दहन नव्हे, तर दफन पद्धतीने होतात.

जयललिता, उदयनिधी स्टालिनचे आजोबा करुणानिधी यांचेही दफन करण्यात आले तामीळनाडूत सनातन विरोध इतका टोकाचा आहे की, तेथे ‘पौर्णिम’ ऐजी अमावास्येला मंगल कार्ये, उद्घाटने, शुभारंभ केले जातात.

अशा द्रविडी स्थानातून सनातन धर्मास विरोध होणे ही बाब आश्चर्यकारक नाही. जातीयता, आर्थिक भेदभाव व अस्पृश्यता या चिडीतून दक्षिणेत सनातनविरोधात ठिणगी पडली. तशी ती वारंवार महाराष्ट्रातही पडली भिक्षुकशाही, राजकीय सामाजिक पेशवाई, जाती प्रथा याविरोधात महाराष्ट्राने सतत बंड केले.

मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश नाकारला तेव्हा ब्राह्मण असलेल्या साने गुरुजींनी उपोषण आरंभले. जातीयतेचे चटके सोसणाऱ्या महाराष्ट्रातूनच डॉ बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज निर्माण झाले छत्रपती शिवाजी महाराज जातपात मानत नव्हते.

त्यांचे सैन्य, अष्टप्रधान मंडळाची रचना तेच दर्शवते त्यामुळे द्रविडी नेत्यांचा सनातन विरोध हा अज्ञानावर आधारित आहे व ते त्यांचे प्रांतीय राजकारण आहे. 1924 मध्ये केरळमधल्या त्रावणकोर येथील राजाच्या मंदिरात येण्या-जाण्याच्या रस्त्यावर दलितांना प्रवेशबंदी करण्यात आली. त्यातून दलितांनी बंड केले.

राजाने ते आंदोलन दडपून टाकले. तेव्हा ई. व्ही. रामास्वामी म्हणजेच पेरियार यांनी त्या आंदोलनात उडी घेतली त्यांनी दीर्घकाळ दलितांच्या हक्कासाठी लढा दिला.

तुरंगवास भोगला पेरियार यांच्याप्रमाणे अनिष्ट प्रथांविरोधात लढणारे अनेक कर्ते पुरुष हिंदू धर्मात निर्माण झाले. महाराष्ट्रात डॉ आंबेडकरांच्या चळवळीस उच्च वर्णीयांचा सक्रिय पाठिंबा होताच महाडच्या चवदार तळयाचा संघर्ष करण्यामागे सुरबा नाना टिपणीस होते.

आगरकर, फुले, महर्षी कर्वे, कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी विठ्ठल रामजी शिंद जोतिबा फुले, गाडगे महाराज, प्रबोधनकार ठाकरे यांच्या चरित्रांचे पारायण उदयनिधींनी करायला हवे बाबा आमटे यांनी जातपात न पाहता कुष्ठ रोग्यांना नवे जीवन दिले जगात असे उदाहरण नसेल.

महाराष्ट्राची संतपरंपरा ही सनातनी असली तरी सामाजिक सुधारणा स्वीकारणारी होती. जगातील कोणताही धर्म निर्दोष नाही. प्रत्येक धर्मात पाखंडाचा अंश आहे.

भाजपचे हिंदुत्व जसे ढोंगी तसे ढोंग सर्वच धर्मात आहे वीर सावरकर हे प्रखर हिंदुत्ववादी, पण त्यांचा दृष्टिकोन विज्ञानवादी होता सनातन धर्म गाईला देवता माता मानतो वीर सावरकरांना गोमातेचे थोतांड मान्य नाही बाळासाहेब ठाकरे हिंदुहृदयसम्राट, पण त्यांनीही स्पष्टच सांगितले, शेंडी- जानव्याचे घंटा बडवणाऱ्यांचे हिंदुत्व आपल्याला मान्य नाही.

याउलट भाजपचे आहे. ते निवडणुकीत राम बजरंग बली आणतात व लोकसभेत राजेशाहीचे प्रतीक म्हणून सेंगोल’ आणतात हे विज्ञान नसून रूढीवाद आणि हुकूमशाही आहे समाजाला जुन्याच परंपरांत व जोखडात अडकवणारा ‘सनातनी विचार नव्या पिढीस मान्य नाही धर्म तसाच राहील.

जुनाट परंपरा, रूढी, विषमतेची जळमटे गळून पडतील. उदयनिधी स्टालिन, रशियात लेनीन आणि स्टॅलिनचा विचारही टिकला नाही त्यांचे पुतळे लोकांनी तोडले, पण हिंदुस्थानात सनातन धर्म आहे. राहील!

सौजन्य – सामना

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही