Ambadas Danve | मुंबई: जालना जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान आंदोलकांवर पोलिसांनी लाठी हल्ला केला आहे.
या घटनेचे पडसाद राज्याच्या राजकीय वर्तुळात दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने आज राज्यपालांची भेट घेतली आहे.
जालना जिल्ह्यात घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा असं, ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.
Who exactly ordered the lathi attack? – Ambadas Danve
अंबादास दानवे (Ambadas Danve) म्हणाले, “01 सप्टेंबर रोजी जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर लाठी हल्ला झाला. या हल्ल्याचे आदेश नेमके कोणी दिले होते? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या घटनेची जबाबदारी घ्यायला तयार नाही.
ज्यांनी हा आदेश दिला आहे, त्यांच्यावर सखोल कारवाई व्हायला हवी. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या प्रकरणानंतर जाहीर माफी मागितली होती.
मात्र, जालना जिल्ह्यात घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी आमची मागणी आहे. महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचे तरुण पेटलेले आहे.
त्यांना इतर समाजाचा पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे हे आंदोलन थांबवायचं असेल, तर वटहुकूम काढून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागेल. संसदेच्या विशेष अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणासाठी कायदा आणला पाहिजे.”
पुढे बोलताना ते (Ambadas Danve) म्हणाले, “मराठा आरक्षणासाठी सुरू असलेलं आंदोलन सध्या खूप तीव्र झालं आहे. हे आंदोलन शांततेत व्हावं, अशी आमची इच्छा आहे.
या आंदोलनामध्ये जनतेला इजा होऊ नये, असं आम्हाला वाटत आहे. मात्र, वेगवेगळ्या प्रकारचं आमिष दाखवून सरकार हे आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न करत आहे.
परंतु, मराठा समाज आता कुणालाच ऐकणार नाही. मराठा समाजाच्या या भूमिकेला शिवसेनाने (ठाकरे गट) पाठिंबा दर्शवला आहे. आम्ही हिंदुत्ववादी आहोत, असं सरकार म्हणतं असतं. मग मराठा हिंदू नाहीये का? मराठ्यांवर लाठी चार्ज करणं चालतं का? सरकारचं हे नेमकं कोणतं हिंदुत्व आहे?”
महत्वाच्या बातम्या
- Maratha Reservation | मनोज जरांगे यांना झेड प्लस सुरक्षा द्या; सकल मराठा समाज महाराष्ट्राची मागणी
- Prakash Ambedkar | इंडिया-भारत वादात विरोधी पक्ष भाजपच्या ट्रॅपमध्ये अडकलाय – प्रकाश आंबेडकर
- Asim Sarode | CM शिंदे यांचा राजीनामा घेण्यासाठी कारणं तयार केली जात आहे का? – असीम सरोदे
- Pankaja Munde | बॉम्बेचं जसं मुंबई होऊ शकतं, तसंच इंडियाचं भारत होऊ शकतं – पंकजा मुंडे
- Pankaja Munde | आता नुसती आश्वासनं नको; मराठा आरक्षणावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया