Share

Pankaja Munde | आता नुसती आश्वासनं नको; मराठा आरक्षणावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया

🕒 1 min read Pankaja Munde | पुणे: जालना जिल्ह्यामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन सुरू असताना पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला असल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेनंतर आंदोलनाने तीव्र वळण घेतलं आहे. अशात या मुद्द्यावर आता भाजप नेत्या पंकजा मुंडे (Manoj Jarange) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जालना जिल्ह्यात घडलेली … Read more

Published On: 

🕒 1 min read

Pankaja Munde | पुणे: जालना जिल्ह्यामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन सुरू असताना पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला असल्याचा प्रकार घडला आहे.

या घटनेनंतर आंदोलनाने तीव्र वळण घेतलं आहे. अशात या मुद्द्यावर आता भाजप नेत्या पंकजा मुंडे (Manoj Jarange) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जालना जिल्ह्यात घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असून त्या घटनेची सखोल चौकशी व्हावी, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

The incident in Jalna district is very unfortunate – Pankaja Munde

भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) शिवशक्ती परिक्रमा यात्रेदरम्यान पुणे शहरामध्ये दाखल झाल्या होत्या. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना पंकजा मुंडे यांनी जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, “जालना जिल्ह्यात घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे.

या घटनेची निपक्ष आणि सखोल चौकशी व्हायला हवी. आता नुसती आश्वासनं नको, तर एखाद्यानं याचं नेतृत्व स्वीकारायला पाहिजे. मराठा समाजाला कधी किती आणि कसे आरक्षण मिळणार? याबाबत ठोस माहिती सांगणारा आश्वासित चेहरा समोर आला पाहिजे.”

दरम्यान, गेल्या नऊ दिवसांपासून मराठा समाजाचा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे. आज सकाळीच त्यांची प्रकृती अत्यंत खालावली.

मात्र, त्यानंतर देखील त्यांनी त्यांचं उपोषण मागे घेतलं नाही. त्यांची प्रकृती खालवल्यामुळे मराठा कार्यकर्त्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. सरकारने जरांगे यांच्या तब्येतीकडे लक्ष द्यावं, असं मराठा आंदोलकांनी म्हटलं आहे. तर काहीही झालं तर उपोषण सोडायचं नाही, असा निश्चय जरांगे यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही