Maratha Reservation | जालना: जालना जिल्ह्यामध्ये मनोज जरांगे (Manoj Jarange) मराठा आरक्षणासाठी आंदोलन करताना दिसत आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे.
उपोषणाच्या 09 व्या दिवशी त्यांची प्रकृती अत्यंत खालवली आहे. मात्र, त्यानंतर देखील ते आंदोलन करताना दिसत आहे. काहीही झालं तरी उपोषण सोडायचे नाही, असा निश्चय त्यांनी केला आहे.
अशात त्यांची प्रकृती खालावल्याने मराठा कार्यकर्त्यांच्या चिंतेत भर पडली आहे. सरकारने मनोज जरांगे यांच्या प्रकृतीकडं लक्ष द्यावं, असं मराठा आंदोलकांनी म्हटलं आहे.
Manoj Jarange’s health has deteriorated
मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे. आज त्यांची प्रकृती खालावली आहे. आज त्यांना अत्यंत अस्वस्थ वाटत असल्यामुळे उपोषण स्थळीचं जरांगे यांना सलाईन लावण्यात आली आहे. त्यांच्याभोवती कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे.
मनोज जरांगे यांची प्रकृती खालवल्याची माहिती मिळतात जालना, छत्रपती संभाजीनगर आणि आसपासच्या जिल्ह्यातून मराठा कार्यकर्ते उपोषण स्थळी दाखल होताना दिसत आहे. आज या आंदोलन स्थळी मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, काल (05 सप्टेंबर) राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने आंदोलन आणि मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तरीही मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) कोणताही तोडगा निघालेला नाही.
यानंतर काल रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची बैठक झाली असल्याची माहिती मिळाली आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी ही बैठक पार पडली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या या बैठकीमध्ये मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा झाली असल्याचं बोललं जात आहे. त्यांच्या या बैठकीनंतर मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार का? याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
- Uddhav Thackeray | सगळेच चोर मोदी कसे? ठाकरे गटाचा खडा सवाल
- Maratha Reservation | रात्री उशिरा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची झाली बैठक; मराठा आरक्षणाबाबत घेणार मोठा निर्णय?
- Vinayak Raut | शिंदे-फडणवीस सरकार मराठा समाजाचे मारेकरी – विनायक राऊत
- Rohit Pawar | महाराष्ट्रातील जनता दिल्लीसमोर झुकणार नाही – रोहित पवार
- Bacchu Kadu | पंकजा मुंडेंसोबत आम्ही युती करू – बच्चू कडू