Share

Rohit Pawar | महाराष्ट्रातील जनता दिल्लीसमोर झुकणार नाही – रोहित पवार

Rohit Pawar | जळगाव: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुन्हा एकदा मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांची आज जळगाव जिल्ह्यामध्ये जाहीर सभा पार पडणार आहे.

शरद पवारांच्या या सभेपूर्वी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलत असताना रोहित पवार यांनी भाजप सरकारवर खोचक टीका केली आहे.

प्रसार माध्यमांशी बोलत असताना रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, “भारतीय जनता पक्षांनं नेत्यांना फोडलं, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फोडलं.

भाजपने कितीही प्रयत्न केला, कितीही शक्ती आणि पैशांचा वापर केला तरी महाराष्ट्रातील जनता दिल्ली समोर झुकणार नाही. नेते फोडले म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपला असं भारतीय जनता पक्षाला वाटत असेल.

मात्र, पवार साहेब संपलेले नाही. शरद पवार व्यक्ती नसून एक विचार आहे. तो विचार भारतीय जनता पक्ष लोकांच्या मनातून कधीच काढू शकत नाही.”

Sharad Pawar works from 6 am to 11 pm – Rohit Pawar

पुढे बोलताना ते (Rohit Pawar) म्हणाले, “अनेक जण शरद पवार यांच्या वयावरून त्यांच्यावर टीका करतात. मात्र, वयावरून काही सिद्ध होत नाही.

आज शरद पवारांचं वय 83 वर्ष आहे. ते 83 वर्षाचे असले तरी ते युवा नेते आहे. कारण सकाळी सहा वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत शरद पवार साहेब काम करत असतात.

भारतीय जनता पक्षाला राज्यातून संपवायचा प्रयत्न करायचा आहे. यासाठी मुळावर वार करायचा असं शरद पवारांनी सांगितलं आहे. यासाठी आम्हाला सर्वांची साथ हवी आहे.”

“आमच्यातील काही लोक सत्तेत सामील झाले आहे. विकासासाठी आम्ही सत्तेत सामील झालो असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तिकडे ते विकासासाठी गेले आहेत तर राज्यात 22 हुन अधिक जिल्ह्यात दुष्काळ पडला आहे.

पुढच्या चार-पाच दिवसात त्यांनी दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करायला हवी”, असही ते (Rohit Pawar) यावेळी म्हणाले आहे.

महत्वाच्या बातम्या

Rohit Pawar | जळगाव: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुन्हा एकदा मोर्चे बांधणीला सुरुवात …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now