Sanjay Raut | टीम महाराष्ट्र देशा: मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यामध्ये मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहे. त्यांच्या या आंदोलनादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला.
पोलिसांच्या लाठीचार्जनंतर देखील त्यांचं आंदोलन सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आंदोलन करणारी लोक 50 खोक्यांसमोर झुकणार नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
The agitating people are simple and poor – Sanjay Raut
प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “मनोज जरांगे जालना जिल्ह्यातील एका छोट्याशा खेड्यामध्ये मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसले आहे.
वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दाखवून आणि दबाव टाकून मनोज जरांगे झुकले नाही. यासाठी त्यांचं कौतुक आहे. ही लोक 50 खोक्यांनी विकली जाणार नाही. आंदोलन करणारी माणसं साधी आणि गरीब आहेत. ती लोक न्यायासाठी लढत आहेत. ते 50 खोक्यांसमोर झुकणार नाही.”
जालन्यामध्ये पोलिसांनी आंदोलकांवर जो लाठीचार्ज केला, त्याचे आदेश वरून आले असल्याचं विरोधकांनी म्हटलं होतं. विरोधकांच्या या टीकेवर अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली होती.
लाठी हल्ल्याचे वरून आदेश आल्याचं विरोधकांनी सिद्ध करून दाखवावं असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अजित पवार यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत म्हणाले, “मी भाजपसोबत जाणार नाही, असं अजित पवार म्हणाले होते. तर राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करणार नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.
देवेंद्र फडणीस अजित पवारांना चक्की पिसिंग पिसिंग म्हणायचे. मात्र तसं झालं आहे का? देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे निष्ठेच्या आणा-भाका घेऊन कशी बेईमानी करतात? हे आपण सर्वांनी पाहिलं आहे. त्यामुळं मराठा समाजानं यावेळी अत्यंत सावध राहिलं पाहिजे.”
महत्वाच्या बातम्या
- Sharad Pawar | मराठा समाजाला आरक्षण कसं मिळेल? शरद पवार म्हणतात…
- Eknath Khadse | एकनाथ खडसे देणार भाजपला मोठा झटका! माजी आमदार आणि खासदार करणार राष्ट्रवादीत प्रवेश
- Sanjay Raut | मराठा समाजाची आणखी किती फसवणूक करणार? संजय राऊतांचा राज्य शासनाला सवाल
- Pravin Darekar | उद्धव ठाकरेंसारख्या घर कोंबड्यानं फडणवीसांची लायकी काढू नये – प्रवीण दरेकर
- Vijay Wadettiwar | जीवात जीव असेपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही – विजय वडेट्टीवार