Share

Sanjay Raut | मराठा समाजाची आणखी किती फसवणूक करणार? संजय राऊतांचा राज्य शासनाला सवाल

🕒 1 min readSanjay Raut | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचे पडसाद राज्याच्या राजकीय वर्तुळात दिसून आले आहेत. या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. काल राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले, सारथीच्या परदेशी शिष्यवृत्तीसाठी आम्ही दोन हजार कोटी रुपये दिलेत.Related News … Read more

Published On: 

🕒 1 min read

Sanjay Raut | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचे पडसाद राज्याच्या राजकीय वर्तुळात दिसून आले आहेत.

या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. काल राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले, सारथीच्या परदेशी शिष्यवृत्तीसाठी आम्ही दोन हजार कोटी रुपये दिलेत.

मुख्यमंत्री महोदय ही बघा सारथीच्या परदेशी शिष्यवृत्तीची अवस्था. आणखी किती फसवणूक मराठा समाजाची करणार?, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Spending crores on advertisement then why not on Sarathi’s scheme? – Sanjay Raut

ट्विट करत संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “काल राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले”, सारथीच्या परदेशी शिष्यवृत्तीसाठी आम्ही दोन हजार कोटी रुपये दिलेत.” मुख्यमंत्री महोदय ही बघा सारथीच्या परदेशी शिष्यवृत्तीची अवस्था. आणखी किती फसवणूक मराठा समाजाची करणार ?

माझे सरकारला चार प्रश्न आहेत. त्याची उत्तर सरकारने द्यावी

प्रश्न १) ‘सारथी’द्वारे पदवीसाठी ३० लाख, तर पीएचडी साठी ४० लाखांच्या मर्यादित शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. मात्र, ओबीसी व समाजकल्याण विभागाद्वारे परदेशी शिष्यवृत्तीमध्ये पूर्ण अभ्यासक्रम शुल्क (रकमेची मर्यादा नाही).

याशिवाय विमान प्रवास भाडे, निर्वाह भत्ता, वैयक्तिक आरोग्य विमा, स्टेशनरी शुल्क, अर्जाचे शुल्क देण्यात येते. याला कोणतीही मर्यादा लावली जात नाही. मात्र, सारथीला मर्यादा का ? असा प्रश्न सरकारला आहे.

प्रश्न २) ७५ जागांसाठी फक्त ८२ अर्ज संस्थेला प्राप्त झाले आहेत. आपल्या जाचक अटींमुळे विद्यार्थी अर्ज करू शकले नाहीत. त्यामुळे अर्ज करण्यासाठी १० दिवसांचा कालावधी वाढवून द्यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे, तरी सारथीने मुदतवाढ का दिली नाही ?

प्रश्न ३) ओबीसी आणि समाजकल्याणसाठी पदवीला ५५ ते ६० टक्क्यांची अट, मग सारथीला ७५ टक्क्यांची अट का?

प्रश्न ४) जाहीरतीवर कोट्यावधी खर्च मग सारथीच्या योजनावरती का नाही?”

दरम्यान, संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या या प्रश्नानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. संजय राऊत यांच्या या प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांकडून काय प्रतिक्रिया येईल?

याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर संजय राऊत यांच्या या ट्विटनंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नवा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!