Maratha Reservation | जालना: जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन सुरू असताना एक धक्कादायक घटना घडली आहे.
आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला आहे. या घटनेचे पडसाद राज्यात उमटलेले असून राज्याचं राजकारणही यानंतर चांगलं तापलं आहे. अशात उपोषणकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) आज एक मोठा निर्णय घेणार आहे.
I will give up water – Manoj Jarange
मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. राज्य सरकारचं शिष्टमंडळ आज मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार आहे.
या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “मराठा समाजाला (Maratha Reservation) न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.
सरकारने लवकरात लवकर अध्यादेश घेऊन यावं नाही तर आजपासून पाण्याचा त्याग करणार. आज सरकारी अध्यादेश आला नाही तर पाच वाजल्यापासून मी पाण्याचा त्याग करेल”, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, या प्रकरणावरून प्रहारचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी देखील राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, “महाराष्ट्रातील मराठा कुणबी असून ही काळा दगडावरची पांढरी रेघ आहे.
सरकारी कार्यालयामध्ये ज्यांची कुणबी म्हणून नोंद आहे, त्यांना सरकारने तातडीने प्रमाणपत्र द्यायला हवे. त्याचबरोबर सरकारने वेगळा कायदा करण्याच्या भानगडीत पडू नये.
गरज पडली तर मी देखील उपोषण करायला मागे पुढे पाहणार नाही. सरकारने फक्त अंत पाहू नये नाही तर सरकारचा अंत व्हायला वेळ लागणार नाही. आज राज्यामध्ये जे आंदोलन सुरू आहे. त्याचा सन्मान करणं महत्त्वाचं आहे.”
महत्वाच्या बातम्या
- Uddhav Thackeray | मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे खोटं बोलण्यात वस्ताद; ठाकरे गटाचा राज्य सरकारवर हल्लाबोल
- Bacchu Kadu | सरकारने अंत पाहू नये, नाहीतर सरकारचा अंत होण्यास वेळ लागणार नाही – बच्चू कडू
- Ajit Pawar | लाठी हल्ल्याचे वरून आदेश आल्याचं विरोधकांनी सिद्ध करून दाखवावं – अजित पवार
- Eknath Shinde | मनोज जरांगेंच्या मागण्यांवर सरकार काम करतंय – एकनाथ शिंदे
- Devendra Fadnavis | लाठी हल्ल्यात जखमी झालेल्यांची मी माफी मागतो – देवेंद्र फडणवीस