Ramdas Kadam | “माझ्या मुलाचा अपघात घडवून त्याला…”; रामदास कदमांचा खळबळजनक दावा

Ramdas Kadam | मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राजकारणात अपघाताची मालिका सुरू आहे. आमदार जयकुमार गोरे, आमदार धनंजय मुंडे यांच्या कारचा अपघात झाला होता. माजी मंत्री रामदास कदम यांचे सुपुत्र आणि शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या वाहनाला देखील शुक्रवारी (६ जानेवारी) रात्री भीषण अपघात झाला.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूरजवळ कशेडी घाटात हा अपघात घडला. या अपघातात आमदार योगेश कदम यांच्या चालकासह तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले. या प्रकरणाचा तपास सुरू असताना माजी मंत्री रामदास कदम यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

योगेश कदम यांचा अपघात घडवून त्यांना गाडीसह दरीत ढकलण्याचा कट होता, असा गौप्यस्फोट रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केला. अपघातानंतर योगेश कदमांची गाडी सुदैवाने पोलिसांच्या गाडीला धडकली. यामुळे हा कट फसला, अशा आशयाचं विधान कदम यांनी केलं आहे.

“योगेश कदम यांच्यासोबत झाला अपघात नसून घातपात आहे. या अपघाताबाबत दाल में जरूर कुछ तो काला है!”, असं म्हणत रामदास कदम यांनी संशय व्यक्त केलाय. या प्रकरणी ड्रायव्हरची कसून चौकशी सुरू आहे. पण हा ड्रायव्हर हा खोटा बोलतोय. मात्र माझ्या मुलाचा आणि माझं नशीब म्हणून माझा मुलगा वाचला”, असंही रामदास कदम म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या :

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.