Devendra Fadnavis | टीम महाराष्ट्र देशा: मराठा समाजाचं आरक्षणासाठी जालना जिल्ह्यामध्ये तीव्र आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलकांवर लाठी हल्ला केला.
या घटनेनंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. अशात या प्रकरणावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जालना जिल्ह्यात घडलेल्या घटनेत अनेक लोक जखमी झाले आहेत. त्यांची मी शासनाच्या वतीने माफी मागतो, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, “मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. जालन्यामध्ये सुरू असलेल्या उपोषणातील मागण्यांवर देखील या बैठकीत सखोल चर्चा झाली आहे.
जालन्यामध्ये सुरू असलेल्या आंदोलनामध्ये दुर्दैवी घटना घडली आहे. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला आहे. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे.
अशा प्रकारच्या बळाचं समर्थन केलं जाऊ शकत नाही.यापूर्वी मी पाच वर्ष गृहमंत्री होतो. त्यावेळी जवळपास 2000 आंदोलन झाली होती. मात्र, त्यावेळी आम्ही कधीच बळाचा वापर केला नाही.
आता देखील बळाचा वापर करण्याचं कोणतंच कारण नव्हतं. त्यामुळं या घटनेत ज्या निष्पाप नागरिकांना इजा झाली आहे. त्यांची मी शासनाच्या वतीनं जाहीर माफी मागतो.”
Eknath Shinde has decided to conduct a high-level inquiry into the matter – Devendra Fadnavis
पुढे बोलताना ते (Devendra Fadnavis) म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
या घटनेचं राजकारण करणं योग्य नाही. काही नेत्यांनी आणि पक्षांनी या घटनेचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला आहे. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.
लाठी चार्जचे आदेश देण्याचे अधिकार एसपी आणि डीवायएसपी यांच्याकडे असतात, हे सर्व नेत्यांना माहित आहे. तरी देखील मंत्रालयातून लाठी चार्जचे आदेश आले असल्याचं बोललं जात आहे.”
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde | मनोज जरांगे उपोषण मागे घेणार? CM शिंदेंचा निरोप घेऊन अर्जुन खोतकर जरांगेंच्या भेटीला
- Sharad Pawar | शरद पवार ॲक्शन मोडमध्ये! आजी-माजी आमदारांची बोलावली महत्त्वाची बैठक
- Ajit Pawar | अजित पवार सत्तेतून बाहेर पडा; बारामतीकरांची जोरदार घोषणाबाजी
- Chitra Wagh | आरक्षण टिकवण्याच्या जबाबदारीपासून पळालेले तुम्ही भगोडे आणि कायर; चित्रा वाघांची संजय राऊतांवर टीका
- Pankaja Munde | मराठा आरक्षण हा राजकारणाचा विषय नाही – पंकजा मुंडे