Ajit Pawar | बारामती: जालन्यात मराठा आरक्षणासाठी तीव्र आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला असल्याची घटना घडली आहे.
या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यामध्ये दिसून आले आहे. तर या घटनेच्या पार्श्वभूमीवर बारामती शहर आणि तालुक्यामध्ये बंद पुकारण्यात आले आहे. यासाठी बारामती शहरामध्ये मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चामध्ये हजारो संख्येने बारामतीकर सहभागी झाले आहे.
A march has been taken out in Baramati over Maratha reservation
जालना जिल्ह्यात घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर बारामती शहरामध्ये सरकारच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला आहे. सरकारचा भरलाय घडा अजित पवार (Ajit Pawar) सत्तेच्या बाहेर पडा, अशा घोषणा बारामतीकर देत आहे.
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन सत्तेतून बाहेर पडावं, अशी मागणी देखील बारामतीकरांनी केली आहे. बारामतीकरांच्या या घोषणाबाजीनंतर अजित पवारांना चांगलाच घरचा आहेर मिळाला आहे.
दरम्यान, जालना जिल्ह्यात घडलेल्या घटनेवर भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, “मुळात मराठा आरक्षण हा राजकारणाचा विषय नाही.
या प्रकरणावर आम्ही भाष्य करून काही उपयोग नाही. कारण जे घटनेतून करता येईल, तेच शक्य होऊ शकतं. नाना पटोले, छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी समाजाबाबत भूमिका मांडत असताना मराठा आरक्षणाला देखील पाठिंबा दर्शवला आहे.
मराठा समाजाची मागणी अत्यंत स्पष्ट आहे. त्याचप्रमाणे या प्रकरणामध्ये आमची भूमिका देखील स्पष्ट आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
मात्र, तो प्रयत्न यशस्वी होऊ शकला नव्हता. या मुद्द्यांमध्ये सत्ताधाऱ्यांनी माय बापाची भूमिका स्वीकारायला हवी. प्रसंगी हळवी आणि कडक ही माय बापाची भूमिका असते.
सत्ताधाऱ्यांनी आंदोलकांच्या मागणीवर गांभीर्याने विचार करायला हवा. त्याचबरोबर या प्रकरणाची निपक्ष चौकशी व्हायला हवी.”
महत्वाच्या बातम्या
- Chitra Wagh | आरक्षण टिकवण्याच्या जबाबदारीपासून पळालेले तुम्ही भगोडे आणि कायर; चित्रा वाघांची संजय राऊतांवर टीका
- Pankaja Munde | मराठा आरक्षण हा राजकारणाचा विषय नाही – पंकजा मुंडे
- Raj Thackeray | लाठी चार्ज करणाऱ्यांना मराठवाड्यात बंदी केली पाहिजे – राज ठाकरे
- Uddhav Thackeray | राज्यात पुन्हा एकदा काका-पुतणे येणार आमने-सामने! ठाकरे गटात होणार प्रवेश
- Sanjay Raut | जालन्यात झालेल्या लाठीमारामध्ये पोलिसांचा दोष नाही – संजय राऊत