Pankaja Munde | टीम महाराष्ट्र देशा: जालना जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे.
या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. ठिकठिकाणी आंदोलकांकडून या घटनेचा निषेध केला जात आहे.
अशात आता या प्रकरणावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आरक्षण हा राजकारणाचा विषय नाही, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या, “छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, नाना पटोले यांनी ओबीसी भूमिका मांडत असताना मराठा आरक्षणाला देखील पाठिंबा दिला आहे.
मराठा समाजाची मागणी अत्यंत स्पष्ट आहे. त्यांच्या त्या मागणीसाठी आमचा पाठिंबा देखील जाहीर आहे. मुळात हा एक संवैधानिक विषय आहे.
मराठा आरक्षण हा राजकारणाचा विषय नाही. या प्रकरणात आमच्या बोलण्यानं काही होणार नाही. जे घटनेतून करता येईल तेच होऊ शकतं.”
An attempt was made to give reservation to the Maratha community – Pankaja Munde
पुढे बोलताना त्या (Pankaja Munde) म्हणाल्या, “या प्रकरणामध्ये आमची भूमिका स्पष्ट आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, तो प्रयत्न सफल होऊ शकत नाही.
कारण ते घटनेनुसार शक्य नाही. उगाच मराठा समाजाला शब्द देण्यात अर्थ नाही. त्यांना दिलेला शब्द जर पूर्ण झाला नाही तर मराठा समाज उद्विग्न होईल.
या मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांनी माय बापाची भूमिका घ्यावी. माय बापाची भूमिका ही प्रसंगी हळवी आणि कडक असते. आंदोलकांच्या मागणीवर सत्ताधाऱ्यांनी गंभीर्याने विचार करायला हवा.
या प्रकरणाची निपक्ष चौकशी व्हायला हवी. मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी सत्ताधाऱ्यांनी जी काही कमिटी स्थापन केली आहे. या प्रकरणाचे त्यांच्याकडे जे काही कागदपत्र आहे, ते कागदपत्र न्यायालयातील टिकतील यासाठी सरकारने प्रयत्न करावे.”
महत्वाच्या बातम्या
- Raj Thackeray | लाठी चार्ज करणाऱ्यांना मराठवाड्यात बंदी केली पाहिजे – राज ठाकरे
- Uddhav Thackeray | राज्यात पुन्हा एकदा काका-पुतणे येणार आमने-सामने! ठाकरे गटात होणार प्रवेश
- Sanjay Raut | जालन्यात झालेल्या लाठीमारामध्ये पोलिसांचा दोष नाही – संजय राऊत
- Vijay Wadettiwar | ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण द्या – विजय वडेट्टीवार
- Praful Patel | शरद पवारांशी आजही माझं बोलणं होतं – प्रफुल्ल पटेल