Chandrakant Khaire | “पकंजा मुंडे शिवसेनेत जाणार?”; चंद्रकांत खैरे म्हणाले…

Chandrakant Khaire | औरंगाबाद : भाजप नेत्या पंकजा मुंडे या नाराज असल्याच्या चर्चा अनेकदा होत असतात. पंकजा मुंडे यांनीही अनेकवेळा पक्षाच्या नेत्यांवर टीका करून आपली नाराजीही व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांना शिवसेनेत येण्याचं आवाहन दिलं आहे. भाजपमध्ये अन्याय होत असेल तर पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत यावं, असं आवाहन आमदार सुनील शिंदे यांनी दिलं आहे. दरम्यान, पंकजा मुंडे शिवसेनेत जाणार का? या संदर्भात विचारले असता शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मोजक्या शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.

“मराठवाड्यातील गावागावात भाजप पक्ष पोहोचवण्याचे काम स्वर्गीय नेते गोपीनाथ मुंडे यांनी केले. त्यांची मुलगी पंकजा मुंडे (Pankaja Munde) हिच्यावर भाजप अन्याय करत आहे. पंकजा मुंडे या खऱ्या युतीमधील खऱ्या वारस आहे, असे शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire ) म्हणाले.

“पंकजा मुंडे यांच्याबाबतीत भाजप राजकारण करत आहे. आमदार सुनील शिंदे यांनी पंकजा मुंडे यांच्याबाबत जे काही म्हणाले त्यात तथ्य आहे. पंकजा आणि उद्धव ठाकरे यांचे बोलणे झाले आहे. कधीही काही होऊ शकते”, असेही त्यांनी सांगितले आहे. आता ठाकरे गटाच्या या आवाहनाला पंकजा मुंडे प्रतिसाद देतात का?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सुनील शिंदे नेमकं काय म्हणाले?

आमदार सुनील शिंदे म्हणाले, पंकजा मुंडे फार मोठ्या नेत्या आहेत. त्यांचा पक्ष मोठा आहे. त्यामुळे त्यांचे मत आणि त्यांच्या क्रिया-प्रतिक्रियेशी माझा काहीही संबंध नाही. पण पंकजा मुंडे भाजपच्या फार मोठ्या नेत्या आहेत. त्यांच्यावर अन्याय होत आहे. हे आम्हाला दिसत आहे. पण हा त्यांच्या पक्षातील अंतर्गत प्रश्न आहे. त्यामध्ये मी काहीही बोलणार नाही. पण त्यांच्या कर्तृत्वाला आम्ही नेहमीच सलाम करत राहू. पंकजा मुंडे पक्षात येत असतील तर त्यांचे स्वागत आहे.

महत्वाच्या बातम्या :

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.