Indian Army Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय लष्करामध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी खुशखबर! कारण भारतीय लष्करामध्ये 191 रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही पण जर भारतीय लष्करामध्ये भरती होण्यासाठी इच्छुक असाल, तर तुम्ही आजच या पदांसाठी अर्ज करू शकतात. या पदांबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार www.joinindianarmy.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.
भारतीय लष्करामध्ये (Indian Army) ‘या’ पदांच्या रिक्त जागा
भारतीय लष्कराने जारी केलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये अभियांत्रिकी पदवीधारकांसाठी 191 रिक्त जागा उपलब्ध आहे. मान्यता प्राप्त विद्यापीठातून सिव्हील/ इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ कम्प्युटर सायन्स इत्यादी विषयात अभियांत्रिकी पदवी असणारे उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. त्याचबरोबर इच्छुक उमेदवाराला इतर विहित पात्रता असणे देखील आवश्यक आहे.
भारतीय लष्कराच्या या भरती प्रक्रियेमध्ये वय वर्ष 20 ते पदानुसार कमाल वय 27/35 पर्यंत असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवार 11 जानेवारी 2023 पासून ते 9 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
भारतीय लष्कराच्या या पदांसाठी अर्ज भरताना उमेदवारांना आधार कार्ड, कास्ट सर्टिफिकेट, लेटेस्ट पासपोर्ट साईज फोटो, ईमेल आयडी, मोबाईल नंबर, आणि मार्कशीट इत्यादी गोष्टी लागतील. भारतीय लष्कराच्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार www.joinindianarmy.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.
महत्वाच्या बातम्या
- Nana Patole | “बंडखोर सत्यजीत तांबेंला काँग्रेस पाठिंबा देणार नाही”- नाना पटोले
- Skin Care Tips | चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करायच्या असतील तर करा ‘या’ टिप्स फॉलो
- Amit Deshmukh | भाजपा प्रवेशावर अमित देशमुखांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “लातूरचा देशमुख वाडा…”
- Rupali Patil | “कपटी, खोट्या तिरिट सोमय्या भाऊ, अंबाआईच तुम्हाला दर्शन देणार नाही”
- Shehzada Trailer | बॉलीवूडने पुन्हा खाल्ली माती; अल्लु अर्जुनच्या सुपरहिट सिनेमाचा केला कचरा