Skin Care Tips | चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करायच्या असतील तर करा ‘या’ टिप्स फॉलो

Skin Care Tips | टीम महाराष्ट्र देशा: स्त्रिया असो वा पुरुष प्रत्येकालाच सुंदर आणि आकर्षक चेहरा हवा असतो. त्यामुळे लोक चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करत असतात. चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्या अनेकांना चिंतेत पडत असतात. झोपेची कमतरता, तणाव, पोषक तत्वांची कमतरता इत्यादी गोष्टीमुळे चेहऱ्यावर सुरकुत्या यायला लागतात. पूर्वी या समस्या फक्त वृद्धांमध्ये दिसून येत होत्या. पण आजकाल अनियमित आहारामुळे आणि बदलत्या जीवनशैलीमुळे या समस्या लहान वयातही निर्माण व्हायला लागले आहेत. यावर उपाय म्हणून लोक अनेक प्रकारचे रसायनक्त उत्पादने वापरतात. पण ही उत्पादने त्वचेला हानी पोहोचवू शकतात. त्यामुळे अशा परिस्थितीत तुम्ही नैसर्गिक पद्धतींचा वापर करू शकतात. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी तुम्ही पुढील टिप्स फॉलो करू शकतात.

बदाम तेल

बदाम तेलाचा नियमित वापर करून चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करता येऊ शकतात. यासाठी तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर बदाम तेलाने मालिश करू शकतात. नियमित रात्री झोपण्यापूर्वी बदाम तेलाने मालिश केल्यास चेहऱ्यावरील सुरकुत्यांची समस्या कमी होऊ शकते. कारण या तेलामध्ये मुबलक प्रमाणात विटामिन ई आढळून येते, जे सुरकुत्या दूर करण्यास आणि चेहरा चमकदार बनवण्यास मदत करते.

योग्य प्रमाणात पाण्याचे सेवन

अनेक वेळा शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या पडण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी तुम्ही भरपूर प्रमाणात पाण्याचे सेवन केले पाहिजे. कारण शरीर हायड्रेट राहिल्याने सुरकुत्याची समस्या कमी होऊ शकते. त्याचबरोबर योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने रक्त शुद्ध होऊन पचन संस्था ही निरोगी राहते.

सनस्क्रीन

तुम्हाला जर तुमचा चेहरा सुरकुत्यांपासून वाचवायचा असेल, तर तुम्ही नियमित सनस्क्रीनचा वापर केला पाहिजे. त्याचबरोबर नियमित सनस्क्रीन लावल्याने तुमची त्वचा टॅनिंगपासून सुरक्षित राहू शकते. जास्त वेळ उन्हात घालवल्याने त्याच्यावर सुरकुत्या पडण्याची समस्या निर्माण होऊ शकते. म्हणून उन्हामध्ये जाताना नेहमी सनस्क्रीन लावूनच गेलं पाहिजे.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

 

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.