Amit Deshmukh | भाजपा प्रवेशावर अमित देशमुखांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “लातूरचा देशमुख वाडा…”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Amit Deshmukh | सांगली : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत फूट पडली आणि सहा महिन्यांपूर्वी महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि भाजपाने एकत्र सत्ता स्थापन केली. तेव्हापासून महाराष्ट्रातील राजकारणात काँग्रेसचे आमदार अमित देशमुख (Amit Deshmukh) आणि आमदार धीरज देशमुख हे भाजपात जाणार असल्याची चर्चा सुरु आहे.

त्यातच भर म्हणजे ‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रात आल्यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी अशोक चव्हाण आणि अमित देशमुख यांच्याबद्दल विधान केलं. “काँग्रेसचे आता काहीच शिल्लक राहिलेलं नाही. लातूरकर आणि नांदेडकर कधीही फडवणवीसांच्या मांडीवर जाऊन बसतील,” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले होते. भाजपा प्रवेशाच्या चर्चेवर आता अमित देशमुखांनी भाष्य केलं आहे.

अमित देशमुख म्हणाले की, “सध्या राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार आहे. परंतु सरकार वैध की अवैध याचा निर्णय सर्वोच्य न्यायालयात लागणार आहे. म्हणजे राज्यात चौथे सरकार कधीही येऊ शकते.” आधी पाहटेच्या शपथविधीचे सरकार आले. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार आले. महाराष्ट्रात पहिलं अडीच दिवसांचं, दुसरं अडीच वर्षाचं आणि आता तिसऱ्या सरकारचा कार्यकाळ सुरु आहे. चौथं सरकार कधीही येऊ शकतं,” अशी टोला देखील अमित देशमुख यांनी हाणला.

“महापालिका निवडणुका कधी होतील हे सुद्धा सांगता येत नाही. सध्या आपण अस्थिर परिस्थितीला तोंड देत आहोत. संजय काका पाटील भाजपा या म्हणत आहेत, पण तुम्हीच स्वगृही परतावे. तसेच, लातूरचा देशमुख वाडा कितीही वादळे आली, कितीही वारे आले तरी तो तिथेच राहणार,” असं अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या :