Share

Urfi Javed | उर्फी जावेद घेणार रुपाली चाकणकरांची भेट; चित्र वाघांना देणार टक्कर

Urfi Javed | मुंबई: सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद (Urfi Javed) आणि भाजपाने नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यामधील वाद अद्याप संपलेला नाही. चित्रा वाघ यांनी उर्फी जावेद विरोधात पोलीस तक्रार दाखल केली होती. तर दुसरीकडे उर्फीने चित्रा वाघ यांना सोशल मीडियावर डिवचलं होतं. उर्फीवरून चित्रा वाघ यांनी महिला आयोगालाही प्रश्न विचारला होता. तेव्हा महिला आयोगाने चित्रा वाघ यांना नोटीस पाठवली होती. या नोटीशीवरून चित्रा वाघ आणि महिला आयोग यांच्यामध्ये वाद निर्माण झाला होता. अशा परिस्थितीत उर्फी आता महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांची भेट घेणार आहे. उर्फी आज रूपाली चाकणकर यांची भेट घेणार आहे. त्यांच्या या भेटीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

आपल्या विचित्र फॅशनने सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या उर्फी जावेदच्या विरोधात चित्रा वाघ यांनी पोलीस तक्रार केली होती. त्याचबरोबर त्यांनी यावरून राज्य महिला आयोगाला देखील प्रश्न विचारले होते. त्यानंतर महिला आयोगाने चित्रा वाघ यांना नोटीस पाठवली होती.”माझा आक्षेप आयोगावर नाही तर अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर आहे,” असं म्हणतं चित्रा वाघ यांनी रूपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधला होता.

चित्रा वाघ यांच्यावर पलटवार करत रूपाली चाकणकर म्हणाल्या, “आम्ही पाठवलेली नोटीस त्यांनी नीट वाचली असती, तर त्यांना हे प्रश्न पडलेच नसते. त्यांचा अभ्यास थोडा कमी असल्याने त्यांना हे प्रश्न पडले आहेत. समाजामध्ये खोटी माहिती पसरवली जात आहे. हा एक धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे आणि त्याबद्दल ही नोटीस आहे.”

तर दुसरीकडे उर्फी ट्विट करत चित्रा वाघ यांना म्हणाली, “उर्फी की अंडरवेअर मे, छेद हे चित्रा ताई ग्रेट है.” इतकंच नव्हे तर तिने या कॅप्शन शेजारी तीन रेड हार्ट इमोजी देखील पोस्ट केले. यापूर्वी तिने पोस्ट करत चित्रा वाघ यांना सासू म्हटले आहे. ती ट्विट करत म्हणाली होती, “मेरी डीपी इतनी धांसू, चित्रा मेरी सासू.”

महत्वाच्या बातम्या

Urfi Javed | मुंबई: सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद (Urfi Javed) आणि भाजपाने नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यामधील वाद …

पुढे वाचा

Entertainment Maharashtra Politics

Join WhatsApp

Join Now