Ritesh Deshmukh | रितेश विलासराव देशमुख (भाऊ) महाराष्ट्रात या नावाची हवा ; जाणून घेऊ त्याचा प्रवास

Ritesh Deshmukh | टीम महाराष्ट्र देशा: बॉलीवूड अभिनेता रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) हा एक असा अभिनेता आहे, जो विनोदी भूमिकेपासून गंभीर भूमिका सहजपणे साकारू शकतो. विनोद आणि गंभीर भूमिकेसह रितेश देशमुख नकारात्मक भूमिका देखील उत्कृष्टरित्या सादर करतो. एक विलन चित्रपटामध्ये त्याने नकारात्मक भूमिका साकारली होती. महाराष्ट्राचा अभिमान असणारा हा अभिनेता चित्रपटसृष्टीमध्ये कसा आला ते जाणून घेऊया.

रितेश देशमुखने शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुंबईच्या कमला रहेजा कॉलेज ऑफ आर्किटेक्चर मधून आर्किटेक्चरची पदवी प्राप्त केली होती. अभिनय क्षेत्रामध्ये प्रवेश करण्याच्या आधी त्याने एका परदेशी आर्किटेक्चरल कंपनीमध्ये वर्षभर प्रशिक्षण घेतले होते. त्यानंतर त्याने भारतात परतल्यानंतर याच फील्डमध्ये काम सुरू केले होते.

दरम्यान, 2003 मध्ये रितेशने ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्याच्या पहिल्या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत जेनेलिया मुख्य भूमिकेत होती. पहिल्या चित्रपटानंतर रितेशला एवढी प्रसिद्धी मिळाली नव्हती. मात्र, 2004 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मस्ती’ चित्रपटाच्या माध्यमातून रितेशची लोकप्रियता अधिक वाढली होती. त्यानंतर त्याने ‘क्या कुल है हम’, ‘मालामाल विकली’, ‘धमाल’, ‘डबल धमाल’, ‘हाउसफुल’, ‘ग्रँड मस्ती’, इत्यादी चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. रितेशने बॉलीवूडशिवाय मराठी चित्रपटसृष्टीमध्येही लोकप्रियता मिळवली आहे. ‘लय भारी’ या चित्रपटाच्या माध्यमातून रितेशने मराठी चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण केले.

रितेश देशमुखच्या वैयक्तिक आयुष्य बद्दल बोलायचे झाले, तर रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा जवळजवळ नऊ वर्ष एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर दोघांनी 2012 मध्ये हिंदू आणि ख्रिश्चन दोन्ही पद्धतीने लग्न केले. त्यानंतर रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख ही जोडी बॉलीवूड मधील सर्वात लोकप्रिय जोडी बनली आहे.

रितेश आणि जेनेलिया नुकतेच ‘वेड’ चित्रपटामध्ये एकत्र दिसले आहे. त्यांच्या ‘वेड’ने महाराष्ट्राला खरोखरच वेड लावले आहे. ‘वेड’ने पहिल्याच दिवशी 2 कोटी 25 लाख रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर पहिल्या आठवड्यामध्ये ‘वेड’ने बॉक्स ऑफिसवर 20.68 कोटी रुपये कमावले. त्यानंतर या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर दहाव्या दिवशी 5.70 कोटींची कमाई केली आहे. यानंतर ‘वेड’ने रेकॉर्ड ब्रेक कमाई करत ‘सैराट’ला मागे टाकलं आहे. एकाच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा ‘वेड’ हा पहिला मराठी चित्रपट ठरला आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.