Nana Patole | ‘‘भाजपने शिंदे गटाला एकही जागा दिली नाही, ते सत्तेत…’’; नाना पटोले नेमकं काय म्हणाले?

Nana Patole | नागपूर : राज्यात विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील पाच जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. त्यासाठी सर्वच पक्षाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी येत्या 30 जानेवारी रोजी निवडणूक होत आहे.

विशेष म्हणजे या पाच जागेमध्ये नागपूरच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही होती. नागपूर शिक्षक मतदारसंघाची निवडणूक महाविकास आघाडी जिंकणार, असा विश्‍वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी व्यक्त केला.

नाना पटोले म्हणाले, “आमचा प्रयत्न आहे की सेनेचे उमेदवार, डायगव्हाणे आणि कपील पाटील यांचा उमेदवार, यांच्यात बैठक घेऊन हमखास निवडून येणाऱ्या उमेदवारासोबत राहू. कॉंग्रेसमध्ये कुणाचीही आणि कशाचीही नाराजी नाही. कॉंग्रेसमध्ये गोंधळ सुरू आहे, असे जे विरोधक बोलत आहेत, तो कुठे आहे  दाखवा.”

पुढे ते म्हणाले, “या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने शिंदे गटाला एकही जागा दिलेली नाही, हे अपेक्षितच होते. ‘ते’ सत्तेत सोबत असूनही एकत्र नाहीत. पण महाविकास आघाडी म्हणून आम्ही एक आहोत आणि पुढे जातोय.”

महत्वाच्या बातम्या :

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.