Weather Update | राज्यात वाढली हुडहुडी, तर मुंबईच्या तापमानात लक्षणीय घट

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: सध्या देशातील वातावरणामध्ये (Weather) बदल होताना दिसत आहे. देशात उत्तरेकडे रक्त गोठवणारी थंडी (Cold) पडत आहे. या थंडीचा परिणाम देशातील इतर राज्यांमध्येही होत आहे. अशा परिस्थितीत दमट वातावरण असणाऱ्या मुंबई शहरात देखील दिवसेंदिवस गारठा वाढत चालला आहे. येत्या काही दिवसांमध्ये मुंबईच्या तापमानात लक्षणीय घट होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. मुंबईमध्ये सध्या पहाटे 4 आणि रात्रीच्या वेळी 16 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर राज्यात पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यातही हुडहुडी वाढली आहे.

सध्या मुंबईमध्ये कडाक्याची थंडी पडत असल्याचे दिसून आले आहेत. मुंबईमध्ये गुरुवारपासून तापमानात लक्षणीय घट झाली आहे. दरम्यान पुढचे चार दिवस मुंबईमध्ये ही थंडी कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. या बदलत्या  वातावरणामुळे नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचा आणि सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, पुढच्या आठवड्यामध्ये देशात बहुतांश ठिकाणी थंडीचा कडाका वाढणार आहे. त्याचबरोबर काही भागांमध्ये रात्रीचे तापमान चार अंश सेल्सिअस तर दिवसाचं तापमान 10 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता देखील हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. थंडी सोबतच दाट धुके पडण्याचा अंदाज देखील हवामान खात्याने वर्तवला आहे.

दरम्यान, काश्मीरच्या खोऱ्यामधील थंडीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काश्मीरमध्ये बहुतांश भागात अपेक्षेपेक्षा जास्त बर्फवृष्टी होण्याचा अंदाज आहे. याचा परिणाम थेट सामान्य जनजीवनावर दिसून येणार आहे. काश्मीरसोबतच उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि सिक्कीम या भागांमध्ये येत्या काही दिवसात बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे.

राज्यामध्ये उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये तापमानात चांगलीच घट झाल्याचे दिसून आली आहे. येथील काही जिल्ह्यांमध्ये तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली येऊन पोहोचलं आहे. त्यामुळे दिवसेंदिवस हळूहळू वाढत चालली आहे. या वाढत्या थंडीमुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत सापडला आहे. अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांना नुकसानाला सामोरे जावे लागले होते. आता पुन्हा एकदा वाढत्या थंडीमुळे शेतकऱ्यांची पिकं धोक्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.