🕒 1 min read
Keshav Upadhye | मुंबई : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील ‘भारत जोडो’ यात्रा जेव्हा काश्मीरमध्ये पोहोचेल, तेव्हा या यात्रेत सहभागी व्हावं, अशी इच्छा असल्याचं म्हंटल आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने दिल्लीत असताना त्यांनी पत्रकार परिषेदेत हे विधान केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी मिश्किल टोला हाणला आहे.
ते म्हणाले, “ठाकरेंचा भोंगा म्हणून महाराष्ट्रास माहीत असलेले संजय राऊत हे आता राहुल गांधीच्या पदयात्रेत सहभागी होण्याचे निमित्त साधून पळ काढू पाहात आहेत.” तसेच, “महाराष्ट्र हे असुरक्षित राज्य आहे, असे म्हणणारे संजय राऊत महाराष्ट्रद्रोही आहेत”, असा आरोपही त्यांनी केला.
याशिवाय, शिंदे फडणवीस सरकारच्या नावाने बोटे मोडत सरकारला घटनाबाह्य ठरविण्याचा प्रयत्न करणाऱ्या उद्धव ठाकरे यांचे पक्षप्रमुखपदच घटनाबाह्य असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे बाळासाहेबांवर निष्ठा असलेल्या तमाम शिवसैनिकांची आणि घटनाबाह्य पदाचा फायदा घेत मुख्यमंत्रीपद पटकावून महाराष्ट्राची फसवणूक केल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी माफी मागावी व पक्षप्रमुख पदावरून पायउतार व्हावे असे आव्हान केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी दिले आहे.
ठाकरे यांच्या सत्तालोभाचे पितळ उघडे पडत असून आता ठाकरे पितापुत्रांनी यावर पाळलेले मौन बरेच बोलके आहे, असा टोलाही उपाध्ये यांनी यावेळी बोलताना उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Skin Care Tips | चेहऱ्याला नियमित साबण लावल्याने होऊ शकतात ‘हे’ तोटे
- Amol Kolhe | “वडिलांच्या कर्तृत्वावर पोळ्या भाजणाऱ्यांनी…”; अमोल कोल्हेंचे राणेंना सडेतोड प्रत्युत्तर
- Ritesh – Genelia Deshmukh | रितेश-जेनेलियाने सर्वांना लावले ‘वेड’
- Prithviraj Chavan | विलासराव देशमुखांचे चिरंजीव अमित भाजपात प्रवेश करणार?; पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “ते भाजपात येणार…”
- Prithvi Shaw | पृथ्वी शॉसारख्या खेळाडूंना संधी का मिळत नाही?, जय शाहच्या ट्विटवर चाहत्यांनी उपस्थित केला प्रश्न
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now