IND vs SL | टीम इंडिया संकटात! सामन्यानंतर ‘या’ दिग्गजाची खालावली तब्येत

IND vs SL | कोलकत्ता: भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यामध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू आहे. काल या मालिकेतील दुसरा सामना कोलकत्ता येथील ईडन गार्डन स्टेडियमवर खेळला गेला. भारतीय संघाने हा सामना 4 विकेट्सने आपल्या नावावर केला. या मालिकेतील तिसरा म्हणजेच शेवटचा सामना 15 जानेवारी रोजी तिरुअनंतपुरम येथे खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडिया संकटात सापडली आहे. सामन्यापूर्वी संघातील एका सदस्याची तब्येत अचानक खालवली आहे. त्यामुळे हा दिग्गज कोलकत्याहून आपल्या घरी परतला आहे.

श्रीलंकेविरुद्ध (IND vs SL) झालेल्या सामन्यानंतर ‘या’ दिग्गजाची खालावली तब्येत

मीडिया रिपोर्टनुसार, भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांची तब्येत अचानक खालावली आहे. त्यामुळे ते कोलकत्याहून बंगळुरू येथील त्यांच्या घरी परतले आहे. राहुल द्रविड यांना सामन्यापूर्वीच हॉटेलमध्ये असताना अस्वस्थ वाटत होतं. त्यांचा रक्तदाब वाढला होता. मात्र, सामन्यानंतर रात्री उशिरा अचानक पुन्हा त्यांची तब्येत बिघडली. अशा परिस्थितीमध्ये श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात राहुल द्रविड भारतीय संघासोबत दिसणार नसल्याचे मानले जात आहे.

श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या एक दिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यांत नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय संघाने प्रथम गोलंदाजी केली होती. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली. श्रीलंकेच्या संघाने भारतीय संघाला 215 धावांचे लक्ष दिले होते. भारतीय संघाने हे लक्ष 6 विकेट्स गमावून पूर्ण केलं. या सामन्यांमध्ये के.एल. राहुलने सर्वाधिक 64 धावा केल्या.

दरम्यान, मीडिया रिपोर्टनुसार बीसीसीआय टी-20 फॉर्मेटमध्ये राहुल द्रविडच्या जागी पर्याय शोधत आहे. यामध्ये परदेशी प्रशिक्षकांचा देखील समावेश आहे. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे की,”आम्ही विविध प्रकारचे पर्याय शोधत आहोत. सध्या आम्ही घरच्या मैदानावर होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी तयारी करत आहोत. कारण आपल्याला तो विश्वचषक जिंकायचा आहे.”

महत्वाच्या बातम्या