🕒 1 min read
भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं गुपित नेमकं आहे तरी काय? असा प्रश्न तुम्हालाही अनेकदा पडला असेल ना? नुकतंच मुंबईत एका कार्यक्रमात खुद्द ‘हिटमॅन’ रोहित शर्माने (Rohit Sharma) यावर अगदी एका शब्दात उत्तर दिलंय. सोबतच त्याने सांगितलेला गल्ली क्रिकेटचा एक मजेशीर किस्सा सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) ‘मुंबई टी-२० लीग’ संदर्भातील एका कार्यक्रमात बोलताना रोहितने जुन्या आठवणींना उजाळा दिला. भारतीय संघ सध्या क्रिकेटच्या मैदानात जो धुमाकूळ घालतोय, त्यामागे फक्त आणि फक्त ‘कठोर मेहनत’ हेच एकमेव कारण असल्याचं त्याने स्पष्ट केलं. तो म्हणाला, “पुरुष असो वा महिला संघ, आमचे खेळाडू जीवतोडून मेहनत घेत आहेत, म्हणूनच आज आपण यशाच्या शिखरावर आहोत.”
Rohit Sharma Speech
यावेळी रोहितने आपला लोकल ट्रेन ते वानखेडे स्टेडियमपर्यंतचा थक्क करणारा प्रवासही उलगडला. तो म्हणाला, “एक काळ असा होता की मी लोकल ट्रेनने राईट साईडची विंडो सीट पकडून वानखेडेवर मॅच बघायला यायचो आणि आज त्याच स्टेडियमवर माझ्या नावाने एक छोटं स्टँड आहे, हे स्वप्न सत्यात उतरल्यासारखं आहे.”
पण या कार्यक्रमात खरी रंगत आणली ती रोहितच्या गल्ली क्रिकेटच्या आठवणीने. गल्लीत खेळताना एखाद्या घराची काच फुटली तर काय करायचं? या प्रश्नावर हिटमॅनने दिलेलं उत्तर ऐकून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. तो म्हणाला, “कॅप्टनने सांगितलेलं असतं की मॅच जिंकायला काहीही करा. मग अशावेळी जर काच फुटलीच, तर ज्याने फोडली त्याला पैसे मागणं चुकीचं आहे. संपूर्ण टीमने ते पैसे भरले पाहिजेत किंवा ज्याच्या वडिलांकडे जास्त पैसे आहेत त्याने दिले पाहिजेत!”
आयपीएल आणि मुंबई लीगसारख्या स्पर्धांमुळे नव्या खेळाडूंना मोठं व्यासपीठ मिळत असून, याचं सर्व श्रेय एमसीए आणि ग्राऊंड्समनला जातं, असंही रोहितने आवर्जून नमूद केलं. एकंदरीत रोहितच्या या ‘दिलखुलास’ अंदाजाने पुन्हा एकदा मुंबईकरांची मनं जिंकली आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘कॅमेरासमोर तरी पूर्ण कपडे…..’; नेटकऱ्याच्या ‘त्या’ कमेंटवर ऐश्वर्या नारकर भडकल्या, म्हणाल्या…..
- जगात युद्ध थांबवण्याची ताकद फक्त मोदींमध्येच? फडणवीसांनी सांगितली आतली बातमी!
- छगन भुजबळांची मोठी घोषणा! गॅससाठी रांगा लावताय? थांबा, ही बातमी आधी वाचाच…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










