Share

‘कॅमेरासमोर तरी पूर्ण कपडे…..’; नेटकऱ्याच्या ‘त्या’ कमेंटवर ऐश्वर्या नारकर भडकल्या, म्हणाल्या…..

अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी योगा करतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. त्यावर कपड्यांवरून ज्ञान पाजळणाऱ्या एका ट्रोलरला त्यांनी सणसणीत उत्तर देत त्याची बोलती बंद केली आहे.

Published On: 

Aishwarya Narkar Slams Troll: कपड्यांवरून सुनावणाऱ्याला चपराक!

🕒 1 min read

सोशल मीडियावर कधी कोण कोणाला टार्गेट करेल, याचा काहीच नेम राहिलेला नाही. पण यावेळी एका ट्रोलरने चक्क चुकीच्या व्यक्तीशी पंगा घेतलाय आणि त्याला याचा चांगलाच फटका बसलाय.

मराठी मनोरंजन विश्वातील एव्हरग्रीन अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) वयाच्या ५० व्या वर्षीही आपल्या फिटनेसने तरुणांना लाजवतात. नुकताच त्यांनी इन्स्टाग्रामवर योगासने करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला होता. पण या व्हिडीओवर एका युजरने अक्कल पाजळत एक अतिशय विचित्र कमेंट केली. त्यानंतर सोशल मीडियावर जे घडलं, त्याचीच सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.

Aishwarya Narkar Slams Troll

एका नेटकऱ्याने थेट कमेंटमध्ये लिहिलं, “निदान कॅमेरासमोर तरी पूर्ण कपडे घालून योगा करत जा मॅडम…” हे वाचून (Aishwarya Narkar Slams Troll) ऐश्वर्या नारकर चांगल्याच भडकल्या. त्यांनी थेट रिप्लाय देत सुनावलं, “बुरसटलेले विचार सोडा, तुमचा फोकस का हलतोय?” हा वाद इथेच थांबला नाही. त्या युजरने थेट इन्स्टाग्रामवर मेसेज करत, त्या फक्त ‘व्ह्यूज’ वाढवण्यासाठी असे कपडे घालत असल्याचा जावईशोध लावला.

यावर ऐश्वर्या यांचा पारा चांगलाच चढला. “कोणी कोणते कपडे घालावेत हा वैयक्तिक प्रश्न आहे,” असं त्यांनी ठणकावून सांगितलं. तरीही तो युजर शांत बसला नाही, “तुमच्या अशा कपड्यांमुळे लहान मुलं बिघडतात,” असा अजब युक्तिवाद त्याने केला. त्यावर अभिनेत्रीने त्याची थेट बोलतीच बंद केली.

“मुलांना व्यायाम करायला शिकवा, म्हणजे विचारांचा समतोल राहील आणि डोकं शाबूत राहील. नाहीतर मोठे होऊन तुमच्यासारखंच होणार,” असं सणसणीत उत्तर ऐश्वर्या यांनी दिलं. या एकाच वाक्याने त्या ट्रोलरची अशी काही हवा काढली की त्याने त्यानंतर एकही मेसेज करण्याची हिंमत केली नाही. पती अविनाश नारकर यांच्यासोबत डान्स रिल्स बनवतानाही त्यांना अनेकदा अशा विकृत मानसिकतेचा सामना करावा लागतो, पण त्या नेहमीच रोखठोक भूमिका घेताना दिसतात.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!