IPL 2023 | IPL च्या प्रेक्षपणावर अंबानींचे वर्चस्व; HOTSTAR ला दिला दणका

IPL 2023 | टीम महाराष्ट्र देशा: आयपीएल (IPL 2023) चाहत्यांसाठी रिलायन्स जिओ (Reliance Jio) खुशखबर घेऊन येत आहे. कंपनी जिओ कनेक्शनसह ऑफरमध्ये आयपीएल मोफत दाखवण्याच्या तयारीत आहे. मार्च-एप्रिल महिन्यामध्ये यावर्षी आयपीएलचा हंगाम सुरू होण्याची शक्यता आहे. रिलायन्स कंपनी आणि Viacom18 आयपीएल 2023 चा हंगाम विनामूल्य दाखवण्याची शक्यता आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, रिलायन्स आपल्या हालचालीने भारतीय खेळाच्या प्रसारणामध्ये खळबळ निर्माण करू शकते. कंपनी हे पहिल्यांदाच करत नाहीये. कतारमध्ये झालेला फुटबॉल विश्वचषक जिओ सिनेमा ॲपवर मोफत दाखवण्यात आला होता. Viacom18 कडे आयपीएलच्या डिजिटल प्रसारणाचे अधिकार आहे. कंपनीने 2023-2017 हंगामासाठी हे अधिकार विकत घेतले आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, यावर्षीचा आयपीएल हंगाम हिंदी, इंग्रजी व्यतिरिक्त इतर प्रादेशिक भाषांमध्ये देखील प्रक्षेपित केल्या जाऊ शकतो. जिओ एका ऑफरमध्ये हे संपूर्ण पॅकेज देणार आहे. हे पॅकेज वापरकर्त्यांसाठी रिचार्ज किंवा पोस्टपेड सेवा उपलब्ध असतील.

दरम्यान, जिओच्या हालचालीचा परिणाम हॉटस्टारवर होऊ शकतो. या कंपनीला भारतात क्रिकेट सामन्यांचे थेट प्रक्षेपण करण्याचा अधिकार आहे. कंपनी आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर लाईव्ह स्पोर्ट्स स्ट्रीमिंग करत असते. मात्र, आता हे अधिकार Viacom18 कडे गेले आहे. अशा परिस्थितीत आता काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.